Mutual Funds: जर तुम्ही सामान्य गुंतवणूकदार असाल तर तुमच्यासाठी कोणता फंड सर्वोत्तम आहे हे माहिती असणे आवश्यक आहे. स्मॉल, मिड, मल्टी कॅप आणि लार्ज कॅप असे फंडांचे चार प्रकार असतात. कारण प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत आणि त्यानुसार त्यात धोकाही आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी योग्य फंडाच्या शोधात असाल तर त्यात काय फरक आहे आणि त्यात गुंतवणूक कशी करावी हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. स्मॉल कॅप फंडाचे बाजारमूल्य ५ हजार कोटींपेक्षा कमी आहे, मिड कॅपचे बाजारमूल्य ५ हजार ते २० हजार कोटी आणि लार्ज कॅपचे बाजारमूल्य २० हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः Money Mantra : आता विशेष FD वर तुम्हाला ८.६१ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार, जाणून घ्या कसे?

लहानात मोठा नफा?

तुम्ही त्यांच्या बाजारमूल्यानुसारच नफ्याचा अंदाज लावू शकता. स्मॉल कॅप फंडांमध्ये अधिक जोखीम असते, परंतु त्यांच्याकडे सर्वाधिक परताव्याची क्षमतादेखील असते. कारण स्मॉल कॅप हा कालांतराने मिड आणि लार्जमध्ये बदलतो. जसजसे ते बदलते त्यानुसार परतावा वाढतो. आता मल्टी कॅप फंडाबद्दल बोलायचे झाल्यास सेबीच्या नियमांनुसार, मल्टी कॅप फंड जारी करणार्‍या फंड हाऊसला २५,२५,२५ टक्के रक्कम लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते. त्याशिवाय उर्वरित २५ टक्के निधी व्यवस्थापक त्याच्या विवेकबुद्धीनुसार चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतो.

हेही वाचाः बिहारमधून मुंबईत आले, अनेक धक्के खाल्ले आणि आज ४५ हजार कोटींच्या कंपनीचे मालक, कोण आहेत बासुदेव सिंग?

यात अधिक चांगल्या रिटर्न्सची आशा

मल्टी कॅप नेहमी कमी जोखमीसह चांगला परतावा देणारा मानला जातो. तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, गुंतवणूकदारांनी फक्त एकाच प्रकारच्या फंडात पैसे गुंतवू नयेत. आता पैसे गुंतवताना ते नेहमी लहान, मध्यम, मल्टी आणि लार्ज कॅपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवा. रिटर्नचे गणित समजून घेऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is the difference between small cap mid cap large cap and multi cap funds vrd