गुंतवणुकीसाठी ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे आणि म्हणून ईटीएफ म्हणजे काय , यातील गुंतवणुकीचे फायदे काय व यात गुंतवणूक कशी करता येते याची आज आपण थोडक्यात माहिती घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईटीएफ(एक्स्चेंज ट्रेडेड फंड) हा म्युचुअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखाच फंड असतो मात्र हा स्टॉक एक्स्चेंज लिस्ट असल्याने शेअरप्रमाणे विकत घेता येतो व याच्या युनिटची बाजारातील किंमत अंडर लायिंग असेटच्या ( मुलभूत मालमत्ता) किंमतीनुसार कमीअधिक होत असते. बेंचमार्क म्युचुअल फंडाने पहिला निफ्टी ईटीएफ २००१ साली बाजारात आणला. ईटीएफ साठी इक्विटी, बॉंड,गोल्ड, करन्सी यासारखे अंडर लायिंग असेट विचारात घेतले जाते. यामुळे ईटीएफ शेअर व म्युचुअल फंडासारखे असतात. यात गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते, डी-मॅट खाते व ब्रोकर कडे खाते असणे आवश्यक आहे. खरेदी/विक्री केलेल्या ईटीएफ युनिटची नोंद आपल्या डी-मॅट खात्यात होत असते.

जरी ईटीएफ म्युचुअल फंडासारखे असले तरी यातील गुंतवणुक म्युचुअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा खालील प्रमाणे फायदेशीर असते.
कर आकारणी: ईटीएफवरील भांडवली लाभ (कॅपिटल गेन) जेव्हा ईटीएफ युनिटची प्रत्यक्ष विक्री केली जाते तेव्हाच विचारात घेऊन त्यानुसार कॅपिटल गेन टॅक्सची आकारणी केली जाते मात्र म्युचुअल फंडातील शेअर्सची खरेदी विक्री वेळोवेळी चालू असते त्त्यामुळे होणारी कर आकारणी ईटीएफपेक्षा जास्त होत असल्याने मिळणारा रिटर्न (परतावा) काही प्रमाणात कमी होतो.

हेही वाचा : Money Mantra: मार्च एन्डिंग जवळ आला; टॅक्स वाचवण्यासाठी हे आहेत पर्याय

ईटीएफ युनिटची खरेदी/विक्री एक्सचेज वर होत असल्याने स्पॉट प्राईसला होत असल्याने शेअर प्रमाणे डे ट्रेडिंग करता येऊ शकते. असे म्युचुअल फंडच्या युनिटच्या बाबतीत करता येत नाही कारण म्युचुअल फंडाच्या युनिटची खरेदी विक्री दिवसाच्या क्लोजिंग प्राईस नुसार होत असते. ईटीएफचे फंड मॅनेजमेंट चार्जेस व एक्स्पेंस रेशो म्युचुअल फंडाच्या तुलनेने कमी असल्याने परतावा जास्त मिळू शकतो. गुंतवणूकदारास इक्विटी, गोल्ड,सिल्व्हर करन्सी ईटीएफ मध्ये सहजगत्या खरेदी विक्री करता येते. प्रत्यक्ष सोने घेण्यापेक्षा गोल्ड ईटीएफद्वारा सोन्यात गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर ठरते.

ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची आहे याबाबत फारशी माहिती नाही अशा नवख्या गुंतवणूकदारांसाठी ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे, यात गुंतवणूक करताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करावा

मॉर्निंग स्टार रेटिंग
गेल्या ३ वर्षांचा रिटर्न
हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
लो ट्रॅकिंग एरर
लो टोटल एक्स्पेंस रेशो

हेही वाचा : Money Mantra: फिनटेकमधले हे बदल आपलं आर्थिक गणित कसं बदलू शकतात?

थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याला शेअर, म्युचुअल फंड, बॉंड , सोने, करन्सी यासारख्या वेगवेगळ्या प्रकारात गुंतवणूक करावयाची आहे व तीही एकाच ठिकाणी व एकाचा खात्यावर करावयाची आहे त्यांनी वेगवेगळ्या ईटीएफ गुंतवणूक करताना संबंधित ज्या ईटीएफचे रेटिंग चांगले आहे, गेल्या ३ वर्षांचा रिटर्नही समाधानकारक आहे, एक्स्चेंज वर हाय ट्रेडिंग व्हाल्यूम आहे तसेच ट्रॅकिंग एरर व टोटल एक्स्पेंस रेशो कमी आहे अशा ईटीएफ मध्ये गुंतवणूक केल्यास पॅसीव्ह इन्व्हेस्टर (निष्क्रिय गुंतवणूकदार) सुद्धा चांगला रिटर्न मिळवू शकतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is exchange traded fund and how to invest in exchange traded fund mmdc css
First published on: 18-02-2024 at 18:12 IST