तुमचा पगार दर महिन्याला ज्या खात्यात येतो, त्याला पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाऊंट (Salary Account) म्हणतात. हे खाते एक प्रकारे बचत खातेच असते. परंतु हे खाते सामान्य बचत खात्याव्यतिरिक्त अनेक सुविधा पुरवते. या खात्यांमध्ये झिरो बॅलन्स सुविधा उपलब्ध असते. तसेच तुम्हाला बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. असे न केल्यास दंड भरावा लागेल. परंतु सॅलरी अकाऊंटच्या बाबतीत ही अट शिथिल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही पगार खाते (Salary Account) कधी उघडू शकता?

देशातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन खाती (Salary Account) उघडतात. कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला या खात्यात जमा केला जातो. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. याशिवाय तुम्हाला झिरो बॅलन्सची सुविधाही मिळते. या खात्यात सलग तीन महिने पगार न आल्यास या खात्यातील सर्व सुविधा काढून घेतल्या जातात. याचा अर्थ ते सामान्य बचत खाते बनते.

हेही वाचाः रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार

पगार खात्या(Salary Account)चे फायदे

पगार खात्यात तुम्हाला चेकबुक, पासबुक, नेट बँकिंगची मोफत सुविधा मिळते. याशिवाय येणार्‍या मेसेजसाठी बँकेकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. या खात्यातून तुम्ही पर्सनल लोन, कार लोन किंवा होम लोन इत्यादीसाठीदेखील अर्ज करू शकता. या खात्यात येणाऱ्या पगारातून तुमच्या उत्पन्नाची माहिती बँकेला मिळते. याशिवाय खाते उघडताना कागदपत्रांची पडताळणीही सहजरीत्या होते.

हेही वाचाः TCS मध्ये वर्क फ्रॉम होम संपुष्टात? १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस कार्यालयात जावे लागणार

तुम्हाला पगार खात्यावर २ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधादेखील मिळते. त्याची मर्यादा तुमचा २ महिन्यांचा मूळ पगार आहे. याशिवाय तुम्ही त्यात मर्यादाही सेट करू शकता. तुम्ही वेल्थ सॅलरी अकाऊंट देखील उघडू शकता. यामध्ये बँक तुम्हाला समर्पित संपत्ती व्यवस्थापका(Dedicated Wealth Manager)ची सुविधा उपलब्ध करून देते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your salary account become a regular account now you will get zero balance facility or not vrd