TCS Work From Home Ends! आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील वर्क फ्रॉम होम १ ऑक्टोबर २०२३ पासून संपुष्टात येऊ शकते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ई-मेलद्वारे आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयटी क्षेत्र आपल्या घरातून काम करण्याच्या धोरणांमध्ये बदल करत असल्याचे हे संकेत आहेत.

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, TCS च्या विविध विभागांचे व्यवस्थापक त्यांच्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएसदेखील वर्क फ्रॉम होम संपवण्याच्या मार्गावर असून,नवी पॉलिसी स्वीकारणार आहे, जेणेकरून आवश्यकतेनुसार काही अपवाद ठेवता येईल.

हेही वाचाः Money Mantra : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची मुदत पुन्हा वाढवली

CNBC-TV18 ने TCS कडून एक अंतर्गत मेल पाहिला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये (जर सुट्टी नसेल तर) दर आठवड्याला ५ दिवस कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. खरं तर TCS च्या पूर्वीच्या भूमिकेतील हा एक मोठा बदल आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सप्टेंबर २०२२ पासून कर्मचार्‍यांनी वेळापत्रकाचे अनुसरण करणे आणि आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी या वेळापत्रकाचे पालन न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही कंपनीने दिला होता.

हेही वाचाः बँकेने चुकून कॅब ड्रायव्हरच्या खात्यात पाठवले ९००० कोटी रुपये, आता एमडीने दिला राजीनामा अन् नंतर झालं असं काही…

टीसीएसने काय उत्तर दिले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल सर्व टीमला पाठवण्यात आलेला नसून तो वेगवेगळ्या प्रकारे पाठवला जात आहे. टीसीएसने मनी कंट्रोलच्या प्रश्नांवर भाष्य करण्यास नकार दिला, कारण कंपनी सध्या शांत आहे.

TCS कर्मचाऱ्यांबद्दल जाणून घ्या

TCS चे ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत ६१५,३१८ कर्मचारी आहेत. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२३ च्या वार्षिक अहवालानुसार, TCS कडे आज जे कर्मचारी आहेत, ते मार्च २०२० नंतर नियुक्त केले गेले आहेत.

Story img Loader