Reliance Industries share price: मुकेश अंबानी यांच्या मालकीची असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअरमध्ये सोमवारी (३ मार्च) १५ महिन्यांच्या निच्चांकी स्तर गाठलेला दिसला. बीएसई सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली. ज्यामुळे १२०३ रुपयांवर असलेला शेअर ११५६ रुपयांवर खाली आला. या उच्चांकी गळतीमुळे शेअरने ५२ आठवड्यातील तळ गाठला आहे. यावर्षी ४ फेब्रुवारी पासून रिलायन्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घसरण का झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयात कमी करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स न्यू एनर्जी कंपनीने बॅटरी सेल प्रकल्प उभारणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प अद्याप उभारलेला नाही. त्यामुळे कंपनीला दंड बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ब्लुमबर्गने यावर वृत्त प्रसारित केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

प्रकल्प स्थापन्याची मुदत ओलांडल्यामुळे रिलायन्स न्यू एनर्जीला १२५ कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

सहा महिन्यात २३ टक्क्यांहून अधिक घसरण

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या शेअरमध्ये मागच्या सहा महिन्यात २३ टक्क्यांहून अधिकची घसरण पाहायला मिळाली आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा हा शेअर ३ सप्टेंबर २०२४ रोजी १५०९.८० रुपयांवर होता. आता ३ मार्च २०२५ रोजी शेअरने ११५६ रुपयांचा तळ गाठला. मागच्या आठ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअरमध्ये २६ टक्क्यांहून अधिकची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

मागच्या ५२ आठवड्यातला शेअरचा उच्चांक १६०८.९५ रुपये इतका होता. तर ५२ आठवड्यातला निच्चांक आता ११५६ वर आला आहे. यामुळे कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य १५,७५,४३८.८५ कोटींवर पोहोचले आहे.

मागच्या महिन्यात दिला होता बोनस शेअर

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने मागच्या महिन्यातच आपल्या भागधारकांना बोनस शेअरची भेट दिली होती. कंपनीने एकास एक याप्रमाणे शेअर वाटले होते. याप्रमाणे कंपनीच्या प्रत्येक गुंतवणूकदाराला एक बोनस शेअर मिळाला होता. याआधी २०१७ आणि २००९ सालीही कंपनीने १:१ या गुणोत्तरात शेअरचे वाटप केले होते.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries share price falls 3 precent to hits 52 week low know why kvg