भारतीय संरक्षण खात्याच्या हवाई दलातील विविध पदांच्या नेमणुकीसाठी आवश्यक ठरणाऱ्या परीक्षांची माहिती देत आहोत –
टेक्निकल ब्रँच ग्रॅज्युएट – बी.टेक. किंवा बी.ई. पदवीधर व्यक्ती इंडियन एअर फोर्सच्या एरोनॉटिकल इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये दाखल होऊ शकतात. टेक्निकल ऑफिसर म्हणून तुम्ही अद्ययावत तंत्रज्ञान हाताळू शकता. भारतीय वायुदलाकडून दोन शिक्षणक्रमांचे आयोजन केले जाते.
एरोनॉटिकल इंजिनीअरिंग कोर्स (इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिकल)- उज्ज्वल भवितव्यासाठी तंत्रज्ञानात पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी वरील दोन शिक्षणक्रमांचा विचार करू शकतात. यासाठी पुरुष व महिला दोघेही पात्र असतात, मात्र महिलांना ‘शॉर्ट सíव्हस कमिशन’ दिले जाते.
वय – १८ ते २८ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
पुरुष व महिलांकरिता
वय वष्रे २५ पेक्षा कमी असलेले उमेदवार अविवाहित असणे बंधनकारक आहे.
युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम (फक्त पुरुषांसाठी)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक. शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षेच्या आधीच्या वर्षांत शिकणारा असावा. एस.एस.बी. (सशस्त्र सीमा बल)च्या निवड चाचणीपूर्वी आधीच्या वर्षांतील विषयांचा कोणताही अनुशेष नसणे अनिवार्य आहे. पदवी परीक्षेत सर्व विषयांत सरासरी ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
एरोनॉटिकल इंजिनीअिरग कोर्स (स्त्री, पुरुषांसाठी)
शैक्षणिक पात्रता – पदवी परीक्षेत सर्व विषयांत सरासरी ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील, मात्र एस.एस.बी. (सशस्त्र सीमा बल)च्या निवड चाचणीपूर्वी आधीच्या वर्षांतील विषयांचा कोणताही अनुशेष नसणे अनिवार्य आहे.
दिलेल्या अवधीत विद्यापीठाकडून मिळालेले पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
पर्मनंट कमिशन फक्त पुरुष उमेदवारांना दिले जाईल आणि शॉर्ट सíव्हस कमिशन स्त्री व पुरुष उमेदवारांना दिले जाईल.
एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक) शैक्षणिक अर्हता :
१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा चार वर्षांचा इंजिनीअिरग पदवी अभ्यासक्रम किंवा असोसिएट मेम्बरशिप ऑफ इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या सेक्शन ‘ए’ व ‘बी’ परीक्षा उत्तीर्ण किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या सेक्शन ‘ए’ व ‘बी’ परीक्षा उत्तीर्ण अथवा इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स ग्रॅज्युएट मेम्बरशिप एक्झामिनेशन उत्तीर्ण.
वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त करीत असताना उमेदवाराने खाली दिलेल्या १८ विषयांपकी किमान आठ अभ्यासिलेले असणे अनिवार्य आहे.
फिजिक्स/ इंजिनीअिरग फिजिक्स, मॅथेमॅटिक्स/ इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स, इंजिनीअरिंग ग्राफिक्स/ ड्रॉइंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग/ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मायक्रोप्रोसेसर्स, कंट्रोल इंजिनीअरिंग, डिजिटल/ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर नेटवर्क, नेटवर्क थिअरी डिझाइन, इलेक्ट्रॉनिक सíकट डिझाइन, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम, रडार थिअरी, इन्स्ट्रमेंटेशन, स्विचिंग थिअरी, मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि अन्टेना वेव्ह
प्रपोगेशन.
एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल)
शैक्षणिक अर्हता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा चार वर्षांचा इंजिनीअिरग पदवी अभ्यासक्रम किंवा असोसिएट मेम्बरशिप ऑफ इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स(इंडिया)च्या सेक्शन ‘ए’ व ‘ब’ परीक्षा उत्तीर्ण किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या सेक्शन ‘ए’ व ‘ब’ परीक्षा उत्तीर्ण.
वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त करीत असताना उमेदवाराने खाली दिलेल्या १८ विषयांपकी किमान आठ अभ्यासिलेले असणे अनिवार्य आहे.
फिजिक्स/ इंजिनीअिरग फिजिक्स, इंजिनीअरिंग ग्राफिक्स/ ड्रॉइंग, मॅथेमॅटिक्स/इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स, इंडस्ट्रियल इंजिनीअिरग/ प्लांट इंजिनीअरिंग, ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग, इंजिनीअिरग मेकॅनिक्स/ एरोडायनेमिक्स, स्ट्रेन्थ ऑफ मटेरिअल, थर्मोडायनेमिक्स आणि अॅप्लिकेशन/ हीट पॉवर इंजिनीअरिंग, हीट मास ट्रान्स्फर, थिअरी ऑफ मशीन्स, टबरे मशीन्स/ फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लाइट मेकॅनिक्स, मशीन डिझाइन/ मशीन ड्रॉइंग, मटेरिअल सायन्स/ मेटलर्जी, मेकाट्रोनिक्स, व्हायब्रेशन्स, वर्कशॉप टेक्नॉलॉजी/ प्रॉडक्शन इंजिनीअरिंग/ मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी, एअरक्राफ्ट स्ट्रक्चर्स, हायड्रोलिक्स, न्यूमॅटिक्स.
ग्राउंड डय़ुटी ब्रँच – भारतीय वायुदलात, ग्राउंड डय़ुटी ऑफिसर या पदावर रुजू होऊन मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांचे व्यवस्थापन सांभाळावे लागते.
हा विभाग भारतीय वायुदलाचा कणा म्हणावा लागेल. विमान आकाशात झेपावण्यापूर्वी पार पाडाव्या लागणाऱ्या अनेक जबाबदार गोष्टी ग्राउंड डय़ुटी ऑफिसरला उचलाव्या लागतात.
सामान्य अर्हता –
वय – पदवीधर उमेदवारांसाठी २० ते २३ वष्रे, द्विपदवीधर उमेदवारांसाठी २० ते २५ वष्रे, कायद्याच्या पदवीधर उमेदवारांसाठी २० ते २६ वष्रे, सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए./ एम.एड्./ पी.एच.डी. उमेदवारांसाठी २० ते २७ वष्रे.
नागरिकत्व – भारतीय
िलग – स्त्री, पुरुष
वैवाहिक दर्जा – २५ वर्षांखालील उमेदवार अविवाहित असणे अनिवार्य प्रशासकीय विभाग
शैक्षणिक पात्रता – सरासरी ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी कोणत्याही शाखेतील सरासरी ५० टक्के गुणांसह पदव्युत्तर परीक्षा / समकक्ष पदविका अकाउन्टस विभाग –
शैक्षणिक पात्रता – सरासरी ६० टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी किंवा सरासरी ५० टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून द्विपदवीधर / सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए.
लॉजिस्टिक ब्रँच –
शैक्षणिक पात्रता – सरासरी ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सरासरी ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदविका उत्तीर्ण शिक्षण विभाग –
शैक्षणिक पात्रता – सरासरी ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी मेटोरोलॉजी विभाग –
शैक्षणिक पात्रता – सरासरी ५० टक्के गुण व गणित आणि भौतिकशास्त्र विषयांत सरासरी ५५ टक्के गुण अनिवार्य खालील कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, विज्ञानाची कोणतीही शाखा/ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/ जिओग्राफी/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स/ अप्लाइड फिजिक्स/ ओशनोग्राफी/ अॅग्रीकल्चरल मेटोरोलॉजी/ इकोलॉजी अॅण्ड एन्व्हायरॉन्मेन्ट /जिओ फिजिक्स/ एन्व्हायरॉन्मेन्टल बायोलॉजी
पर्मनंट कमिशन फक्त पुरुष उमेदवारांना दिले जाते आणि शॉर्ट सíव्हस कमिशन स्त्री व पुरुष उमेदवारांना दिले जाईल.
(अनुवाद – गीता सोनी)
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
हवाई दलाच्या प्रवेशपरीक्षा
भारतीय संरक्षण खात्याच्या हवाई दलातील विविध पदांच्या नेमणुकीसाठी आवश्यक ठरणाऱ्या परीक्षांची माहिती देत आहोत -
First published on: 03-02-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force entrance exam