‘टच द स्काय विथ ग्लोरी’ असे थरारक घोषवाक्य असणाऱ्या हवाई दलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधी आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांची माहिती-
भारताच्या संरक्षण दलांमध्ये भूदल, हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि इतर निमलष्करी सेना दले यांचा समावेश होतो. या संरक्षण दलांचा कारभार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण खात्याद्वारे स्वतंत्ररीत्या पाहिला जातो. देशाप्रती उत्कट प्रेम असणाऱ्या, चतन्याने भारलेल्या आणि अहोरात्र सजग राहणाऱ्या आदर्श सनिकांच्या अतुलनीय कामगिरीमुळे भारतीय सेनादल जगात नावाजले जाते.  
संरक्षण खात्यात काम करण्यासाठी आपण पात्र आहोत, असे आपल्याला वाटत असेल, तर यांपकी कोणताही एक पर्याय स्वीकारून आपले आयुष्य
नव्याने  जगण्यास सुरू करता येईल. याचे कारण संरक्षण खात्यातील नोकरी ही फक्त नोकरी नसून आयुष्य आगळ्या प्रकारे जगण्याचा मार्ग असतो. ‘टच द स्काय विथ ग्लोरी’ असे थरारक घोषवाक्य असणारे हवाई दल देशाप्रती नि:स्वार्थपणे सेवारत आहे. या हवाई दलातील करिअर संधींची माहिती आज करून घेऊयात.
भारतीय हवाई दलाच्या तीन शाखा आहेत- फ्लाइंग, टेक्निकल आणि ग्राउंड डय़ुटी. यांतील नोकरी स्वीकारून तुम्ही इंडियन एअर फोर्समध्ये दाखल होऊ शकता. याकरिता पात्रता प्रवेश परीक्षा खालीलप्रमाणे आहेत –
*  एन. डी. ए. शैक्षणिक अर्हता – बारावी पास गणित व भौतिकशास्त्र विषयांसह
* ए. एफ. सी. ए. टी. पात्रता – इंजिनीअरिंग पदवीधर. ही परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते.
हवाई दलातील ‘फ्लाइंग ब्रांच’मध्ये सहभागी होऊन तुम्ही या दलात प्रवेश मिळवू शकता. भारतीय हवाई दलात ‘वैमानिक’ बनण्याचा उच्चभ्रू पर्यायही निवडू शकता. यासाठी बारावी परीक्षेनंतर एन.डी.ए. किंवा पदवी परीक्षेनंतर सी. डी. एस. ई. प्रवेशपरीक्षा देऊन तुमचे वैमानिक बनण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न सत्यात उतरवू शकता.   
एन. डी. ए.
नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. ही परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. त्यानंतर सíव्हस सिलेक्शन बोर्डाच्या मौखिक चाचणीला सामोरे जावे लागते. यातून निवडलेल्या उमेदवारांना पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट व वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. या निवडपद्धतीद्वारे ‘पर्मनंट कमिशन’साठी निवड होते. या शिक्षणक्रमासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे :
वय : शिक्षणक्रमाच्या सुरुवातीला १६ वष्रे सहा महिने ते १९ वष्रे
नागरिकत्व  : भारतीय
िलग : पुरुष
शैक्षणिक पात्रता : १०+२  (गणित व भौतिकशास्त्र विषयासह) अंतिम वर्षांचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
जाहिरात प्रसारित होण्याचा काळ : मे व डिसेंबर    (यांत बदल होऊ शकतो.)
कम्बाइण्ड डिफेन्स सíव्हस एक्झामिनेशन (सी.डी.एस.ई.) पदवीधर किंवा इंजिनीअर्स या परीक्षेद्वारा हवाई दलाच्या ‘फ्लाइंग ब्रांच’ मध्ये प्रवेश करू शकतात.
यासाठीची पात्रता –
वय : शिक्षणक्रम सुरू होते वेळी १९ ते २३ वष्रे
नागरिकत्व : भारतीय
िलग : पुरुष
अविवाहित असणे आवश्यक.
शैक्षणिक अर्हता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (गणित व भौतिकशास्त्र विषयासह बारावी परीक्षा उत्तीर्ण)/ बी.ई./ बी.टेक. (चार वर्षांचा अभ्यासक्रम)
शेवटच्या वर्षांचे किंवा सत्राचे विद्यार्थीही सदर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, दिलेल्या अवधीत विद्यापीठाकडून मिळालेले पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी गुणांच्या टक्केवारीची अट नाही.
जून आणि ऑक्टोबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होत असते. (यात बदल होऊ शकतो.)
शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन
 ही सेवा संधी जास्तीत जास्त १४ वर्षांसाठी असून, एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट या परीक्षेद्वारा तुम्ही शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनच्या अर्हता चाचण्या देण्यासाठी पात्र होता. नंतर पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट व वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. यासाठी महिला उमेदवारही अर्ज करू शकतात. यासाठीच्या आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे –
वय : १९ ते २३ वष्रे, डायरेक्टोरेट ऑफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशनकडून प्राप्त झालेल्या कमर्शियल पायलट लायसन्स धारकांसाठी वय वष्रे २५.
नागरिकत्व : भारतीय
िलग : पुरुष व स्त्रिया
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व विषयांत सरासरी ६०% गुण व बारावी परीक्षेसाठी गणित व भौतिकशास्त्र विषय आवश्यक. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./ बी.टेक. सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण.  
कोणत्याही उर्वरित विषयांशिवाय उत्तीर्ण असलेले शेवटच्या वर्षांचे विद्यार्थीही सदर परीक्षा देऊ शकतात. मात्र दिलेल्या अवधीत विद्यापीठाकडून मिळालेले पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
इंडियन एअर फोर्सकडून या परीक्षेसाठी जाहिरात जून व डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात येते.    पान ४ पाहा
पान १ वरून
एन.सी.सी. स्पेशल एंट्री
ज्या उमेदवारांकडे नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे एअर िवग सीनिअर डिव्हिजन ‘सी’ प्रमाणपत्र आहे, अशांना या निवड पद्धतीद्वारे प्रवेश मिळतो व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘पर्मनंट कमिशन’ही मिळते. यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे :
वय : शिक्षणक्रमाच्या सुरुवातीला १९ ते २३ वष्रे.
नागरिकत्व : भारतीय.
िलग : फक्त पुरुष.
अविवाहित असणे आवश्यक.
शैक्षणिक पात्रता :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व विषयांत सरासरी ६०% गुण व बारावी परीक्षेसाठी गणित व भौतिकशास्त्र विषय आवश्यक.
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./ बी.टेक. (चार वष्रे.) सर्व विषयांत किमान सरासरी ६०% गुण.
– एन.सी.सी. एअर िवग सीनिअर डिव्हिजन ‘सी’ प्रमाणपत्र.
– शेवटच्या वर्षांचे किंवा सत्राचे विद्यार्थीही सदर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मात्र दिलेल्या अवधीत विद्यापीठाकडून मिळालेले पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
– नॅशनल कॅडेट कॉर्प्सनी आपापल्या एअर स्क्वॉड्रन्स/ डी.जी. एन.सी.सी.कडून अर्ज करायचे आहेत.
सूचना – ६/६ ही नजरेची किमान क्षमता असणे फ्लाइंग ब्रांचमधील प्रवेशासाठी गरजेची आहे. कमजोर नजरेच्या उमेदवारांना ‘पर्मनंट कमिशन’ नाकारले जाते. अर्थात डोळ्यावर विशिष्ट स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करून जर अटींची पूर्तता होत असेल तर तुम्हाला ‘ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर पायलट’ बनण्याची संधी मिळते.
geetacastelino@yahoo.co.in