सैन्य दलाच्या तांत्रिक विभागात नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत- 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या १९.
आवश्यक पात्रता : अर्जदार महिला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स-टेलिकम्युनिकेशन, इंस्ट्रुमेन्टेशन, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग, मेटॅलर्जी, इंडस्ट्रियल वा प्रॉडक्शन इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अथवा या पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेल्या असाव्यात. त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोगट : अर्जदारांचे वय २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ : निवड झालेल्या महिला उमेदवारांना सैन्य दलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून दरमहा २१ हजार रु. मूळ वेतनावर नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्य दलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, लाभ व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रुटिंग, एजीज ब्रँच, आयएचक्यू एमओडी (आर्मी), वेस्ट ब्लॉक- ३, आर.के. पुरम, नवी दिल्ली ११००६६ या पत्त्यावर ७ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunity for womens in military