पश्चिम बंगालच्या कल्याणी येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे घेण्यात येणाऱ्या पशुचिकित्सा व दुग्धोत्पादन विषयातील पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते दहावीच्या शालान्त परीक्षेला बसलेले असावेत.
वयोगट : अर्जदारांचे वय १५ ते २१ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा निवडक परीक्षा केंद्रांवर १८ जून २०१४ रोजी घेण्यात येईल.
संबंधित विद्यार्थ्यांची शालान्त परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ६०० रु.चा ‘ईआरएस ऑफ एनडीआरआय’च्या नावे असणारा व कल्याणी येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ndri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज इन्चार्ज, अॅकेडॅमिक सेल, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट, ईस्टर्न रिजनल स्टेशन, ए- १२ ब्लॉक, कल्याणी जि. नडिया ७४१ २३५ (प. बंगाल) या पत्त्यावर १९ मे २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.                                    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diploma in veterinary and milk production