कंट्रोलर ऑफ क्वालिटी अॅशुरन्स, बंगळुरू येथे चार्जमनच्या चार जागा
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अॅशुरन्सची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज, कंट्रोलर, कंट्रोलरेट ऑफ क्वॉलिटी अॅशुरन्स, जे. सी. नगर पोस्ट ऑफिस, बंगळुरु ४६०००६ या पत्त्यावर १० जानेवारी २०१३ पर्यंत पाठवावेत.
सशस्त्र पोलीस दलांमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी १०६० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्याhttp://ssconline.nic.in किंवा http://ssconline2.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१३.
सैन्यदलात धार्मिक अधिकाऱ्यांच्या ७१ जागा
अर्जदार पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवा. बीए अथवा संस्कृत वा हिंदीतील विशेष पात्रताधारकांना अथवा इस्लाम, बौद्ध वा पारशी धर्माच्या अभ्यासकांना प्राध्यान्य देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील, संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह हेडक्वार्टर्स-रिक्रूटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१३.
गार्डन रिच शिप-बिल्डर्स अँड इंजिनीअर्समध्ये मरीन इंजिनीअर्स बनण्याची संधी
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनीअर्सची जाहिरात पाहावी. अथवा कंपनीच्या ६६६.ॠ१२ी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज टीएमई, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड, टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, ५, डॉ. रवींद्रनाथ टागोर मार्ग, न्यू डनलॉप ब्रिज, बारंगर, कोलकोता- ७०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१३.
‘स्टील अॅथॉरिटी’मध्ये शिकाऊ कामगारांच्या ८५ जागा
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१३.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा-२०१३ अंतर्गत सैन्यदलात ३५५ जागा
उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. त्यांचा जन्म २ जानेवारी १९९५ ते १ जुलै १९९७च्या दरम्यान झालेला असावा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ डिसेंबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्याwww.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१२.