भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये सीनिअर असिस्टंट इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स)च्या १५ जागा
अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ५० वर्षे. सैन्यदलातून निवृत्त उमेदवारांना प्राधान्य.
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पाहावी अथवा ‘बेल’च्या http://www.bel-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डेप्युटी जनरल मॅनेजर (ह्य़ुमन रिलेशन्स), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पोस्ट ऑफिस- भारतनगर, साहिबाबाद, गाझियाबाद (उत्तर प्रदेश) २०१०१० या पत्त्यावर २ मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनटीपीसीमध्ये इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या संधी
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. याशिवाय अर्जदारांनी गेट- २०१५ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.

सोलर एनर्जी कॉपरेरेशन ऑफ इंडियामध्ये सीनिअर इंजिनीअरच्या १३ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, पर्यावरण विज्ञान, पॉवर सिस्टिम्स, इंजिनीअरिंग यांसारख्या विषयांतील पदवी अथवा भौतिकशास्त्र विषयातील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ फेब्रुवारी २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली सोलर एनर्जी कॉपरेरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉपरेरेशनच्या http://www.secl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावेत.      

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunity