इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग- अहमदाबाद, बंगळुरू, गांधी नगर आणि विजयवाडा येथील डिझाइन तसेच संबंधित क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* अहमदाबाद येथे उपलब्ध असणारा चार वर्षे कालावधीचा ‘बॅचलर ऑफ डिझाइन’ हा पदवी अभ्यासक्रम.
* अहमदाबाद, बंगळुरू व गांधीनगर येथे उपलब्ध असणारा अडीच वर्षे कालावधीचा ‘मास्टर ऑफ डिझाइन’ हा पदव्युत्तर पदवी कार्यक्रम.
* विजयवाडा येथे उपलब्ध असणारा चार वर्षे कालावधीचा डिझाइनविषयक पदविका अभ्यासक्रम.

प्रवेश पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना ‘डीएटी’ म्हणजेच डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही प्रवेश पात्रता परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील निर्धारित परीक्षा केंद्रांवर १० जानेवारी २०१६ रोजी घेण्यात येईल.
उमेदवारांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना डिझाइन क्षेत्रातील संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

अधिक माहिती
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या admisions.nid.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.