JEE Mains 2022: जेईई मेन्स २०२२ एप्रिल सत्र परीक्षेसाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in द्वारे ५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९.५० वाजेपर्यंत नोंदणी करू शकतात. याआधी नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती, जी ५ एप्रिल २०२२ पर्यंत वाढवण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने अधिकृत वेबसाइटवर नोटीसही जारी केली होती. एनटीएने परीक्षेचे वेळापत्रक स्वतः जाहीर केले होते. त्याच वेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षेसाठी प्रवेशपत्र १५ एप्रिल २०२२ रोजी जारी केले जाऊ शकते. परीक्षा प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परीक्षेचे वेळापत्रक

जाहीर केलेल्या अधिकृत परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन्स २०२२ एप्रिल परीक्षा २१ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २९ एप्रिल, १ मे आणि ४ मे २०२२ रोजी घेतली जाईल. परीक्षेसंबंधी अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात.

नोंदणी प्रक्रिया

१. सर्वप्रथम उमेदवाराने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी.

२. मुख्यपृष्ठावर दिलेल्या JEE(मुख्य) 2022 साठी नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

३. येथे नवीन नोंदणीवर क्लिक करा.

४. विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करा.

५. आता आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

६. अर्ज फी भरून सबमिट करा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee mains 2022 today is the last date for registration know registration process and schedule ttg