कृषी संशोधन सेवा परीक्षा २०१२ – भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या कृषी संशोधन सेवा परीक्षेद्वारे ४३१ जागा उपलब्ध आहेत. अर्जदारांनी कृषी,
पशू-विज्ञान, कृषी- अभियांत्रिकी, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया, पर्यावरण यासारख्या विषयांतील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा – ३२ र्वष.
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज द सेक्रेटरी, अॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेन्ट बोर्ड, कृषी अनुसंधान भवन, पूसा, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१२.
‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’मध्ये स्टेनोग्राफरच्या चार जागा –
अधिक माहिती आणि तपशिलासाठी एम्प्लॉयमेन्ट न्यूजच्या २४ ते ३० नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ची जाहिरात पाहावी अथवा www.natboard.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१२.
अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमधील विविध संधी – अर्जदार शैक्षणिक मानसशास्त्र, गणित, विज्ञान , बालशिक्षण, आरोग्य आणि निगा, शिक्षणविषयक तत्त्वज्ञान यासारख्या विषयांतील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत आणि त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. याच क्षेत्रातील प्रशिक्षित व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहिती आणि तपशिलासाठी अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या www.azimpremjiuniversity.edu/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व तपशीलवार अर्ज दि एचआर को-ऑर्डिनेटर अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, १३४, दोद्दाकुमुनेली, विप्रो कॉर्पोरेट परिसर, सरियापूर रोड, बंगळुरू ५६००३५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१२.
आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या ९४१ जागा –
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा त्यांनी भारतीय विमान संस्थान, मुंबईची फेलोशिप घेतलेली असावी. सविस्तर अटी, निवडप्रक्रिया, अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी आयुर्विमा महामंडळाच्या www.licindia.in या संकेतस्थळावर careers खालीhttp://www.licindia.in/careers.htm वर संपर्क साधावा.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१२
बारावी उत्तीर्णासाठी नौदलात संधी –
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेन्ट न्यूजच्या २४ ते ३० नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena-bhartiर या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ७००१, आयपीएचओ, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१२.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग, पुणे येथे सीनिअर रिसर्च असिस्टंटच्या तीन जागा –
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र, स्वत:चे नाव आणि पत्ता लिहिलेला व पाच रु.च्या टपाल तिकिटांसह असणाऱ्या लिफाफ्यासह अर्ज कमांडर, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग पोस्ट ऑफिस, पुणे ४११०३१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१२.