स्पर्धापरीक्षा मंत्र
राज्यातील युवावर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेबाबत सजगता वाढू लागली आहे. मात्र, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत मुलांमध्ये फारशी उत्सुकता जाणवत नाही.
दरवर्षी केंद्र सरकार स्टाफ सिलेक्शन कमिशन-सीजीएल परीक्षांच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहाय्यकच्या समकक्ष पदांची भरती करत असते. यात आयकर निरीक्षक, उत्पादन शुल्क निरीक्षक यांसारख्या २५ हून अधिक वेगवेगळ्या पदांचा समावेश होतो.
गेल्या काही वर्षांपासून स्टाफ सिलेक्शन कमिशन- सीजीएल दरवर्षी सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक पदभरती करते, परंतु या परीक्षांकडे मराठी मुलं फारशी वळताना दिसत नाहीत. पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय सहायक या परीक्षा हिरिरीने देणारा ‘मराठी माणूस’ स्टाफ सिलेक्शन कमिशन- सीजीएलच्या परीक्षेला का सामोरा जात नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. तसे पाहता या दोन परीक्षांची तुलना केल्यास आढळून येते की, अभ्यास थोडय़ाबहुत फरकाने सारखाच करावा लागतो. (उलट एमपीएससी- पीएसआय- एसटीआय- असिस्टंटच्या परीक्षांना अधिक विषय अभ्यासावे लागतात.)
दोन्ही परीक्षांतील साम्य
० परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते- (पूर्व, मुख्य आणि मुलाखत).
० पूर्व आणि मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाते.
० पूर्व परीक्षेच्या टप्प्यावर निगेटिव्ह माìकग असते (एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, असिस्टंट या परीक्षांसाठी ती -१/३ तर एसएससी- सीजीएलसाठी ती -१/४ इतकी असते.)
० मुख्य परीक्षेच्या टप्प्यावरदेखील निगेटिव्ह माìकग असते. एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, असिस्टंट या परीक्षांसाठी ती -१/३ तर एसएससी-सीजीएलसाठी ती इंग्रजीच्या पेपरकरता -१/३ तर गणिताच्या पेपरकरता -१/२ इतकी असते.)
टीप : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते तर एसएससी- सीजीएलच्या मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर पारंपरिक लेखी परीक्षा द्यावी लागते. या प्रश्नपत्रिकेचे गुण अंतिम निवडीच्या वेळेस मोजले जात नाही , तर काही पदांकरता संगणक टंकलेखनाची चाचणी
घेतली जाते.
पूर्वपरीक्षांचा तुलनात्मक विचार
१ ढोबळमानाने पूर्वपरीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित प्रश्न असे वर्गीकरण केले जाऊ शकते.
१ पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहायक पूर्वपरीक्षेत सर्वाधिक भर सामान्य अध्ययनावर असतो (७० टक्के) तर त्याखालोखाल बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात (प्रत्येकी १५ टक्के).
१ याच्या अगदी उलट स्टाफ सिलेक्शन कमिशन-सीजीएल परीक्षेत सर्वाधिक भर बुद्धिमत्ता चाचणीवर असतो (५० टक्के) तर त्याखालोखाल इंग्रजी (२५ टक्के), सामान्य अध्ययन (२० टक्के) आणि चालू घडामोडींवर (५ टक्के) प्रश्न विचारले जातात.
१ त्रिकोणमिती आणि इंग्रजी वगळल्यास या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम बहुतांश सारखाच आहे (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, परिस्थितीकी- जैवविविधता, चालू घडामोडी, अंकगणित, भूमिती, तार्किक क्षमता) असे आपल्याला आढळून येईल.
१ पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहायक पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा विशेष संदर्भ लक्षात घेऊन तयारी करावी लागते तर स्टाफ सिलेक्शन कमिशन- सीजीएल पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना राष्ट्रीय पातळीवरील बाबी विचारात घ्याव्या लागतात.
मुख्य परीक्षेचा तुलनात्मक विचार
१ स्टाफ सिलेक्शन कमिशन- सीजीएलच्या मुख्य परीक्षेचे स्वरूप पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहायक मुख्य परीक्षेच्या तुलनेत सुटसुटीत आहे.
१ या दोन्ही मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात, परंतु त्यातील विषय, एकूण गुण आणि निगेटिव्ह माìकगची पद्धत यात प्रकर्षांने फरक आढळून येतो.
१ पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहाय्यक मुख्य परीक्षेत पेपर क्र. १ मध्ये मराठी (६०), इंग्रजी (४०) या दोन विषयांचा तर पेपर क्र. २ मध्ये सामान्य अध्ययन (६०), विषयाचे ज्ञान (२५), बुद्धिमत्ता चाचणी (१५) विषयांचा समावेश होतो.
टीप : प्रत्येक पेपरसाठी वेळ : १ तास, प्रश्नसंख्या : १००, गुण: १०० निगेटिव्ह माìकग : -१/३
स्टाफ सिलेक्शन कमिशन-सीजीएल मुख्य परीक्षेत पेपर क्र. १ मध्ये अंकगणितीय क्षमता (२०० गुण- अंकगणित, भूमिती, त्रिकोणमिती) तर पेपर क्र. २ मध्ये इंग्रजीचा (२००) समावेश होतो.
टीप : प्रत्येक पेपरसाठी वेळ : २ तास, प्रश्नसंख्या : १००, गुण: २०० निगेटिव्ह माìकग : इंग्रजीच्या पेपरकरता -१/३ तर गणिताच्या
पेपरकरता -१/२)

परीक्षेची तयारी कशी कराल?
पोलीस उपनिरीक्षक/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालय साहाय्यक आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन- सीजीएल या परीक्षांच्या तयारीचे योग्य नियोजन केल्यास यश दृष्टिक्षेपात येणे शक्य आहे.
१ अभ्यासाचे विषयानुसार सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असे दोन गट करता येतील.
१ सामान्य अध्ययनाची तयारी करताना दोन्ही परीक्षांमध्ये विचारले जाणारे सामायिक विषय आधी
अभ्यासावेत. (जसे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, परिस्थितीकी- जैवविविधता, चालू घडामोडी.)
१ अगदी याच पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणीतील सामायिक विषयांची निवड करा (जसे अंकगणित आणि भूमिती.). मराठी आणि इंग्रजी या विषयांचा समावेश करताना त्यांचा बुद्धिमत्ता चाचणीतील विषय म्हणून जाणीवपूर्वक विचार करायला हवा.
१ आता जे विषय सामायिक नाहीत, परंतु मुख्य परीक्षेत ज्यांचा समावेश होतो असे विषय वेगळे अभ्यासावेत. (जसे पोलीस उपनिरीक्षक पदाकरता मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रियासंहिता, भारतीय पुरावा कायदा संगणक ज्ञान,
माहितीचा अधिकार-२००५ हे विषय, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन-सीजीएलकरिता त्रिकोणमिती
हा विषय.)
अभ्यासाची दिशा कशी असावी?
६ परीक्षेबद्दल सखोल माहिती करून घ्या.
६ अभ्यासक्रमाचे विश्लेषण करा.
६ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा.
६ मोजक्याच परंतु योग्य संदर्भस्रोतांची निवड करा.
६ अभ्यासाचे नियोजन करा, त्याप्रमाणे
वेळापत्रक आखा.
६ सतत उजळणी आणि सराव करत राहा.