प्रवीण चौगले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर दोनमधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारत व जागतिक महासत्ता यांच्यातील संबंधांवर थोडक्यात चर्चा करणार आहोत. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान आधी महासत्तांशी असणारे द्विपक्षीय संबंध यांचा समावेश होतो. भारताच्या महासत्तांशी असणाऱ्या संबंधांचे अध्ययन करताना दोन्ही देशांमधील लोकशाही, बहुलवादीसमाज, विकास, दोन्ही देश सामोरे जात असलेल्या समान समस्या अशी एककेंद्रांभिमुखता (Convergence), बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी यांसारखे विवादास्पद (Confrontation) मुद्दे आणि दहशतवाद, प्रदूषण, पर्यावरणीय व जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटींमध्ये समान भूमिका, व्यापाराचा विकास, जागतिक शांतता व स्थैर्य आदी सहकार्यात्मक (Co- Operation) क्षेत्रांना ओळखून या घटकाची तयारी पद्धतशीरपणे करता येते. या लेखामध्ये आपण भारताचे अमेरिका, रशिया आणि जपान यांच्या सोबत असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा आढावा घेऊ. भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनयिक संबंधांची सुरुवात नोव्हेंबर १९४१पासून झाली. अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबत सहानुभूती होती. अमेरिकेला असा विश्वास होता की, भारताने हिटलर विरुद्धच्या संघर्षांमध्ये दिलेल्या सहकार्याच्या बदल्यामध्ये ब्रिटनने भारताला स्वयंशासनाचे वचन द्यावे. भारत अमेरिका संबंधांची अशाप्रकारे सुरुवात झाली होती. या दोन्ही देशांतील संबंधांचे शीतयुद्धकालीन परिस्थिती, भारताकडून अमेरिकेला वेळोवेळी करण्यात आलेली मदत तसेच शीतयुद्धानंतरचा कालावधी व सद्य:स्थितीच्या पार्श्वभूमीवर अध्ययन करणे आवश्यक ठरते. सध्या भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता वाढत असल्याचे दिसते. शिवाय अमेरिकेच्या पुर्नसतुलन धोरणामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून भारताचे महत्त्व अधोरेखित होते. अलीकडे बायडेन आणि मोदी यांच्यामध्ये झालेली चर्चा आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि विदेश मंत्र्यांमध्ये झालेली  २+२ चर्चा ही युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या आहेत. या संघर्षांमध्ये भारताने युरोप आणि अमेरिकेसारखी भूमिका ठेवावी अशी अमेरिकेची इच्छा होती, तर भारताने आपला पारंपरिक मित्र असलेल्या रशियाशी असलेली मैत्री लक्षात घेऊन विरोधाची भूमिका घेतलेली नाही. यामध्ये भारताला दोन्ही देशांशी सलोख्याचे संबंध व भागीदारी कायम ठेवायची इच्छा दिसून येते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation of upsc exam in marathi zws
First published on: 05-07-2022 at 03:14 IST