सैन्यदलात थेट भरती योजनेअंतर्गत महिला इंजिनीअर्सची नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या १९.
शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिलांनी सिव्हिल इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोगट : अर्जदारांचे वय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्यनिवड मंडळातर्फे लेखी निवड परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी अलाहाबाद, भोपाळ वा बंगळुरू येथे बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ : निवड झालेल्या महिला इंजिनीअर्सना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून दरमहा १५६००-३९१००-५४०० या वेतनश्रेणीत इतर भत्ते व लाभांसह नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार भविष्यकालीन बढतीच्या संधी पण उपलब्ध असतील.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची इंजिनीअरिंगविषयक जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या  http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१४.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special opportunities for women engineers in army