केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या समाजकल्याण आणि सशक्तीकरण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांना देणाऱ्या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या दोन हजार असून यापैकी ६०० शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. ५०० शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक वा तंत्रज्ञानविषयक उच्च शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक पात्रता : २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षांत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत –
० अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांहून अधिक नसावे.
० योजनेंतर्गत अर्ज करणारे विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.
उपलब्ध शिष्यवृत्ती व लाभ : योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती व लाभ उपलब्ध होतील –
० विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित शैक्षणिक सत्रात दरमहा २,५०० रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दरमहा ३,००० रु.ची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरता पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी ६ हजार रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरवर्षी १० हजार रु. देण्यात येतील.
० याशिवाय असे विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्यास त्यांना दरमहा ७०० रु. तर इतरांना दरमहा ४०० रु. अतिरिक्त देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : या योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची जाहिरात पाहावी अथवा नॅशनल हॅण्डीकॅप्ड फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या http://www.nhfdc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१४.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती
केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या समाजकल्याण आणि सशक्तीकरण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांना देणाऱ्या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
First published on: 11-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special scholarship for handicapped students