यशस्वी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टींचा शोध घेतात. त्यांना कितीही माघार आणि पीछेहाट स्वीकारावी लागली तरी ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं मिळण्याची अपेक्षा करतात. प्रत्येक धक्का त्यांना अथकपणे, त्यांच्याकरता अटळ असलेल्या यशाकडे घेऊन जाणाऱ्या योजनेचा एक भाग आहे, यावर त्यांचा विश्वास असतो.
जर तुमच्या समजुती पुरेशा सकारात्मक असतील तर तुम्ही प्रत्येक धक्का आणि समस्येत एक मूल्यवान धडा शोधाल. तुमचे अंतिम यश मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या मार्गावर तुम्हाला खूप धडे शिकायचे आहेत, यावर विश्वास ठेवाल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक समस्येकडे, शिकण्याचा एक अनुभव म्हणून पाहाल. नेपोलिअन हिलने लिहिले, ‘प्रत्येक अडचण आणि अडथळय़ामध्ये त्याच्या इतक्याच मोठय़ा लाभाचे आणि हिताचे बीज असते.’’
अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे, तुमच्याबाबत घडणाऱ्या प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टीकडून तुम्ही तुमचे प्रमुख निश्चित उद्दिष्ट प्राप्त करताना जसजसे वर चढत जाता आणि पुढे जाता, तसतसा फायदा होतो.
आध्यात्मिक शिक्षिका इमेट फॉक्स एकदा म्हणाल्या, ‘‘आयुष्यातले तुमचे मुख्य काम म्हणजे तुम्हाला बाहेरच्या जगात जे मिळवायची इच्छा आहे आणि ज्याचा आनंद घेण्याची इच्छा आहे त्याच्या समतुल्य गोष्ट आतमध्ये तयार करणे.’’
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
चांगल्याचा शोध घ्या.
यशस्वी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टींचा शोध घेतात. त्यांना कितीही माघार आणि पीछेहाट स्वीकारावी लागली तरी ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं मिळण्याची अपेक्षा करतात.

First published on: 23-12-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take a search of good things