रोहिणी शहा

कर सहायक पदनिहाय पेपर ३ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पेपरसाठी सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

*  प्रश्न १) पुढीलपकी कोणत्या विषयावर राज्यपाल वटहुकूम काढू शकतात?

१)   सातव्या परिशिष्टातील राज्य व समवर्ती सूचीमधील विषय

२)   सातव्या परिशिष्टातील कोणत्याही सूचीमध्ये समाविष्ट नसलेले विषय.

३)   राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असलेल्या विधेयकांचे विषय.

४)   वरीलपैकी एकही नाही.

*       प्रश्न २) पुढीलपकी चुकीचे विधाने ओळखा.

अ. मूलभूत अधिकारांवर व्यवहार्य निर्बंध घालता येतात तर मार्गदर्शक तत्त्वांवर असे र्निबध घालण्याची तरतूद नाही.

ब.   मूलभूत अधिकार ही राज्याची नकारात्मक जबाबदारी आहे.

१) अ बरोबर ब चूक

२) ब बरोबर अ चूक

३) अ आणि ब दोन्ही चूक

४) अ आणि ब दोन्ही बरोबर

*       प्रश्न ३) पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

अ. पहिली पंचवार्षकि योजना सन १९५५मध्ये सुरू झाली.

ब.   भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षी नववी पंचवार्षिक योजना सुरू झाली.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ    ३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*  प्रश्न ४) अकराव्या पंचवार्षकि योजनेमधील समावेशक विकासामध्ये पुढीलपकी कोणती बाब समाविष्ट नाही?

१) कृषी क्षेत्रामध्ये ४ टक्के वाढ करणे

२) रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करणे

३) लिंग गुणोत्तर कमी करणे

४) भांडवली बाजाराचे सक्षमीकरण

* प्रश्न ५) वस्तू व सेवा करासंदर्भात खालील विधाने वाचा.

अ. वस्तू व सेवा करासंदर्भात असीम दासगुप्ता समिती नेमण्यात आली होती.

ब.   वस्तू व सेवा कर हा जगात सर्वप्रथम ब्राझील देशात लावण्यात आला होता.

१) अ आणि ब दोन्ही बरोबर

२) फक्त अ बरोबर

३) फक्त ब बरोबर

४) अ आणि ब दोन्ही चूक

*       प्रश्न ६) खालीलपकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ. देशीनामा पद्धतीमध्ये माहिती ही भारतीय भाषांमध्ये जतन केली जाते.

ब.   लेखाकर्माची देशीनामा ही पद्धत दुहेरी नोंद पद्धतीवर आधारित आहे.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*       प्रश्न ७) खालीलपकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ.       विक्रीहक्क हा भांडवली स्वरुपाचा हक्क आहे.

ब.   ज्या स्वरूपात माल खरेदी केला जातो त्याच स्वरूपात त्याची विक्री केल्यास ती फेरविक्रीमध्ये समाविष्ट होत नाही.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

*       प्रश्न ८) कांचन चौधरी यांच्याबाबत कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ. त्या देशातील पहिल्या महिला पोलिस संचालक होत्या.

ब.   सन १९९७मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देउन सन्मान करण्यात आला.

पर्याय

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

उत्तरे व स्पष्टीकरणे

*      प्र.क्र.१ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

*      प्र.क्र.२ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)

*      प्र.क्र.३ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३) पहिली पंचवार्षकि योजना सन १९५१ मध्ये सुरू झाली होती.

*       प्र.क्र.४ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)

अकराव्या पंचवार्षकि योजनेची उद्दिष्टे

*   योजनेच्या अंतापर्यंत जीडीपीमध्ये १० टक्के विकास दर साध्य करण्यासाठी वार्षकि वाढीचा सरासरी ९ टक्के विकास दर गाठावा.

*   अधिक सर्वसमावेशक वाढ मिळविणे जेणेकरून विकासाचे फायदे सर्व घटकांपर्यंत पोहोचतील.

*   शेतीत चार टक्क्यांची वाढ.

*   सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी करणे.

*   २००९पर्यंत सर्वासाठी विजेची व्यवस्था करणे.

*   नोव्हेंबर २००७ पर्यंत देशातील सर्व खेडय़ांमध्ये टेलिफोन सेवांची व्यवस्था करणे.

*   लिंग-गुणोत्तर किंवा पुरुष-महिला प्रमाण सुधारणे.

*   सर्वाना मूलभूत भौतिक पायाभूत सुविधा तसेच आरोग्य आणि शिक्षण सेवेत प्रवेश सुनिश्चित करणे.

*   २००९ पर्यंत १००० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (डोंगराळ आणि आदिवासी भागात ५००) सर्व वस्तीसाठी बारमाही रस्ता जोडणी.

*   ७० दशलक्ष नवीन कामाच्या संधी निर्माण करणे.

*   ७ वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी साक्षरता दर ८५ टक्क्यांपर्यंत वाढविणे.

*   स्त्री-पुरुष साक्षरतेमधील फरक १० टक्क्यांपर्यंत खाली आणणे.

*   बालमृत्यू दर २ पर्यंत कमी करणे आणि माता मृत्यू दर १००० थेट जन्मासाठी १ पर्यंत कमी करणे.

*   एकूण प्रजनन दर कमी करणे

*  २००९ पर्यंत सर्वाना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे.

*      प्र.क्र.५  – योग्य उत्तराचा पर्याय

क्र. (२) GST जगात सर्वप्रथम फ्रान्स या देशात लावण्यात आला होता. दि. १ जुल २०१७ रोजी वस्तू व सेवा कर देशभरामध्ये लागू करण्यात आला. असीम दासगुप्ता यांना भारताच्या जीएसटीचे आर्किटेक्ट म्हणून ओळखले जाते.

*      प्र.क्र.६ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२)

*      प्र.क्र.७ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४) विक्रीहक्क हा महसुली स्वरुपाचा हक्क आहे. ज्या स्वरूपात माल खरेदी केला जातो त्याच स्वरूपात त्याची विक्री केल्यास ती फेरविक्रीमध्ये समाविष्ट होतो.

*      प्र.क्र.८ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

कांचन चौधरी या किरण बेदी यांच्यानंतरच्या देशातील दुसऱ्या आयपीएस अधिकारी आहेत, तर पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. दूरदर्शनवरील उडान मालिका ही त्यांच्या जीवनावर आधारित होती.