अनुराधा सत्यनारायण-प्रभुदेसाई

दिव्या एमएनसीमध्ये कनिष्ठ व्यवस्थापक आहे. ती तिची स्वप्नवत नोकरीत आता रुळली आहे. कॅम्पसच्या मुलाखतीद्वारे तिला नोकरी मिळाली होती. तथापि, स्वप्नवत वाटणारी नोकरी मधल्या काळात एक भयानक वास्तव बनून तिच्या समोर ठाकली होती. दिव्याला नैराश्य आणि चिंता आणि टीमशी जुळवून घेण्यास असमर्थता यासाठी माझ्याकडे पाठवण्यात आले होते.

तिच्याशी चर्चा केल्यानंतर तिच्याविषयी सर्वात महत्त्वाची समस्या लक्षात आली ती म्हणजे ती तिच्या टीमशी आणि बहुतेकांबरोबर जुळवून घेऊ शकली नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टीम बरोबर होणारे वाद तिला हाताळता आले नाहीत. वाद-विवाद व्यवस्थापन ही समजूतदार, निष्पक्ष आणि कार्यक्षम पद्धतीने अडचणी ओळखणे आणि त्यांचे निराकरण करण्याची कला आहे.

आमच्या सत्रांमध्ये आम्ही वाद समजून घेण्याच्या आणि व्यवस्थापित करण्याच्या मूलभूत गोष्टींवर कार्य करतो आणि अशा प्रकारे चांगले आंतरवैयक्तिक कौशल्ये निर्माण करतो.

हेही वाचा >>> SAIL Recruitment 2024: ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू; अशी होणार उमेदवारांची निवड

वाद व्यवस्थापनावर काम करणे

परिस्थितीचा विचार करा : नात्यात खरी समस्या काय आहे आणि तुम्ही त्यात कसे योगदान दिले असेल ते समजून घ्या. थोडे थांबा! एक क्षण थांबणे तुम्हाला तीव्र प्रतिक्रिया देण्यापासून रोखण्यास मदत करेल. हे थांबणे तुम्हाला वादाच्या विषयावर विचार करण्यासाठी आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी थोडा वेळ देईल.

उत्तम श्रोता व्हा : काय बोलले जात आहे याकडे बारकाईने लक्ष द्या आणि तुम्हाला समजत नसल्यास, गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टीकरण मिळेल असे प्रश्न विचारा.

तुमचा दृष्टिकोन मांडा : तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि तुम्हाला ते कसे म्हणायचे आहे ते ठरवा. लोकांना दोष देणे टाळा. त्याऐवजी, तुमच्यासाठी काय काम करत नाही ते त्यांना कळवा आणि वादातील तुमच्या भूमिकेची जबाबदारी स्वीकारा. तुमच्या ऐवजी मी याचा वापर विधानांमध्ये करा. म्हणजे

सहानुभूतीने आणि विचारपूर्वक वागा : दुसरी व्यक्ती जे काही म्हणत आहे याच्याशी तुम्हाला सहमतच असण्याची गरज नाही, परंतु तुम्ही सहानुभूती दाखवू शकता आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा खरा प्रयत्न करू शकता. संभाषण कुठे वाहवत जात असल्यास असे संभाषण ते थांबवणे किंवा तिथेच समाप्त करणे योग्य ठरेल.

सभ्य भाषा वापरा : विशेषत: मतभेद असताना. तुमचा आवाजाची पातळी तपासा. ती तटस्थ असल्याची खात्री करा.

वस्तुनिष्ठ रहा : तुम्ही होणारे वाद ही वैयक्तिक समस्या बनवत नसल्याची खात्री करा. बऱ्याच वेळा, आपण वादाला वैयक्तिक बनवतो आणि त्यांना व्यावसायिक ठेवत नाही. आपण ते कॉन्फरन्स रूमच्या, डेस्कच्या पलीकडे कॅन्टीनमध्ये किंवा कार्यालयाच्या बाहेर इतरांशी आपल्या दैनंदिन संवादात घेऊन जातो. हे टाळता आले पाहिजे. वाद-विवादांना तिथल्या तिथेच सोडता आले पाहिजे.