डॉ. मिलिंद आपटे
● नमस्कार, सध्या मी बीएससी मॅथेमॅटिक्सच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. गणितात मला विशेष रस आहे. आतापर्यंत शिकलेल्या गणितीय संकल्पना मला सुस्पष्ट आहेत. मला दहावीला ९३ टक्के, १२ वी ला ८६ टक्के गुण होते. तर द्वितीय वर्षाला ९२ टक्के गुण आहेत. मला भविष्यात करिअर च्या कोणत्या संधी आहेत? शिक्षण क्षेत्रात करिअर च्या कोणत्या संधी आहेत ? तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी कोणते पर्याय आहेत? – दीपाली रावते
– करिअरच्या संधीची गणिताच्या विद्यार्थ्याला कधीच कमतरता नसते पण कुठे करिअर करायचे आहे त्यानुसार दिशा, उच्च पदवी व प्रावीण्यचा विषय ठरवता येतो. रिसर्च मध्ये गणितात सांख्यिकी, डाटा सायंटिस्ट, विमा विषयातील अॅक्चुरियल सायन्स, टीचर , स्टॉक मार्केट अॅनॅलिसिस , या व्यतिरिक्त सर्व बँकांमधील उच्च अधिकारी परीक्षा, आयटीमध्ये सुद्धा डाटा अॅनॅलिसिससाठी असे व्यावसायिक लागतात. गणित या विषयामध्ये प्रावीण्य घ्यावे की सांख्यिकी हा तुझ्या आवडीनुसार निर्णय असावा, पण संधींचा विचार करता आता डाटाचे युग आहे, असे म्हणायला हरकत नाही, त्यानुसार निर्णय घ्यावा. खूप शुभेच्छा.
● मी बीटेक (एआयएमएल) च्या द्वितीय वर्षाला आहे. मला दहावीत ८५ व बारावीत (विज्ञान) ७८ टक्के होते. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. मी दररोज वृत्तपत्र वाचन करतो. पण अजून मी एनसीईआरटी वाचायला प्रत्यक्ष सुरुवात नाही केली. मला वेळेचे नियोजन कसे करावे, आतापासून अभ्यास कसा सुरू करावा हे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.- विवेक कासार
– अभ्यासक्रम समजून घ्यावा. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या वढरउ अभ्यासक्रमाशी परिचित होणे हे गरजेचे. यामुळे कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचे हे कळेल आणि व्यर्थ बाबींवर वेळ वाया घालवण्याचे टाळता येईल.
इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यासह प्रत्येक विषयासाठी मानक पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि यूपीएससी अभ्यास साहित्य गोळा करावे. दररोज एक विश्वासार्ह वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात कर आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मासिक चालू घडामोडी मासिके वाच. सुरुवातीस फक्त बातम्या वाचा संपादकीय वाचणे टाळावे, भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया तयार करण्यासाठी मूलभूत पुस्तकांपासून सुरुवात कर. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांसाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके (सहावी ते बारावी) वाचा, कारण ती एक भक्कम पाया प्रदान करतात. वेळेचे नियोजन या विषयावर आता तुझे बीटेक (एआयएमएल) हे द्वितीय वर्ष सुरू आहे, त्याचा आभ्यास पण भरपूर असतो त्याला प्राधान्य द्यावे नाहीतर तुझे प्रावीण्य कुठेही राहणार नाही, ते दुर्लक्ष न करता उर्वरित वेळेत वरील अभ्यास करावा. खूप शुभेच्छा.
careerloksatta@gmail.com