CAT Result 2024 updates: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता यांनी CAT निकाल २०२४ जाहीर केला आहे. CAT 2024ची वेबसाइट iimcat.ac.in वर लॉग इन करून उमेदवार आता त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅटच्या या निकालाच यावर्षी एकूण १४ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात १ मुलगी आणि १३ मुलांचा समावेश आहे. या १४ उमेदवारांपैकी १ नॉन इंजिनियर आणि १३ इंजिनियर उमेदवार आहेत. CAT निकाल २०२४ मध्ये १०० टक्के गुण मिळविणारे सर्वाधिक उमेदवार महाराष्ट्राचे आहेत, त्यानंतर दोन तेलंगणातील आणि आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तरप्रदेशतील प्रत्येकी १ उमेदवार आहे.

२९ उमेदवारांनी ९९.९९ टक्के गुण मिळवले, यात २ मुली आणि २७ मुले उमेदवार आहेत. या उमेदवारांपैकी २८ इंजिनियर आणि १ नॉन इंजिनियर उमेदवार आहे.

हेही वाचा… जेईईमध्ये केलं टॉप अन् नंतर केलं बी. टेक, IIT बॉम्बेचा ‘हा’ विद्यार्थी आता अमेरिकेत करतोय भरघोस पगाराची नोकरी

IIM CAT निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना सर्वाधिक ९९.९९ टक्के गुण मिळाले. महाराष्ट्रातील ५ उमेदवारांनी, कर्नाटकातील ४, राजस्थानमधील ३, दिल्ली आणि गुजरातमधील २ उमेदवारांनी ९९.९९ टक्के गुण मिळवले आहेत.

एकूण ३० उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले असून त्यात १ मुलगी आणि २९ मुलांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील चार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील दोन उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत.

CAT 2024 चा निकाल कसा तपासाल? (How to check CAT 2024 Result)

  • IIM CAT 2024 च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच iimcat.ac.in
  • आता होमपेजवर, ‘कॅन्डिडेट लॉगिन’ वर क्लिक करा.
  • तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • तुमचे CAT 2024 स्कोअर तुमच्या स्क्रीनवर दिसतील
  • काळजीपूर्वक तपासा आणि डाउनलोड करा

CAT 2024 परीक्षा कधी झाली?

CAT परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी भारतभरात तीन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. iimcat.ac.in वेबसाइटवर शेअर केलेला डेटा सूचित करतो की एकूण ३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी सुमारे २.९३ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी १.१९ लाख मुली, २.१० लाख मुलं आणि १४ ट्रान्सजेंडर उमेदवार होते.

३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी, श्रेणीनिहाय (कॅटेगरीनुसार) विभाजन खालीलप्रमाणे आहे:

General – 67.53%, EWS – 4.80%, NC-OBC – 16.91%, SC – 8.51%, ST – 2.25%, PwD (एकूण श्रेणी) – 0.44%. 2.93

२.९३ लाख उमेदवारांपैकी General – 67.20%, EWS – 5.09%, NC-OBC – 17.5%, SC – 8.08%, ST – 2.12%, PwD (एकूण श्रेणी) – 0.41%.

२.९३ लाख उमेदवारांपैकी १य०७ लाख मुली, १.८६ लाख मुलं आणि ९ ट्रान्सजेंडर उमेदवार होते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार IIM CAT ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat result 2024 declared scorecard out iimcat toppers cut off mba admission 100 percentile holders from maharashtra dvr