Exim Bank MT Recruitment 2023: एक्झिम बँकेत विविध पदांवर भरती निघाली आहे ज्यासाठी उमेदवार लवकरच अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेदरम्यान इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईट eximbankindia.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या अभियानावर उमेदवार २१ ऑक्टोबरमधून अर्ज करू शकतात.

भरतीचा तपशील: या भरती प्रक्रियेदम्यान कुल ४५ पदे भरणार आहे ज्यांना बँकिंग ऑपरेशन डिजिटल टेक्नॉलॉजी, राजभाषा आणि अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर ट्रेनीपदासाठी भरती होणार आहे.

पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबधित विषयामध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ६० टक्के गुण असणे आवश्यकता आहे.

हेही वाचा – DRDO RAC येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना ६७ हजारांहून अधिक पगार मिळणार

वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २१ वर्षापासून २५ वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. तसेच आरक्षित वर्गातील उमेदवारांना जास्तीच्या वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.

अधिकृत अधिसुचना – https://www.eximbankindia.in/Assets/pdf/careers/EximBank-MT_Recruitment_Advertisement.pdf

अर्ज शुल्क : या भरतीसाठी उमेदवाराला ६०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना १०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

आवश्यक तारखा : भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. १० नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.