सुहास पाटील

१) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मार्केटिंग डिव्हीजन, मुंबई. (Advt. No. IOCL/ MKTG/ APPR/२०२३-२४) वेस्टर्न रिजनमधील कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा व दादरा नगर हवेली इ. व देशभरातील IOCL च्या लोकेशन्समध्ये ॲप्रेंटिसेसच्या एकूण १,६०३ पदांची भरती.

(१) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – पात्रता – B. A./ B. B. A./ B. Com./ B. Sc. पदवी उत्तीर्ण. महाराष्ट्र – १२४ (अजा – १३, अज – १२, इमाव – ३४, ईडब्ल्यूएस – १३, खुला – ४६), गुजरात – ६०, गोवा – ६, दादरा नगर हवेली – १, दमणदीव – २, छत्तीसगड – ७, मध्य प्रदेश – २५, कर्नाटक – १०.

(२) ट्रेड ॲप्रेंटिस डेटा एन्ट्री ऑपरेटर – पात्रता – १२ वी उत्तीर्ण. (उमेदवार पदवीधर नसावा.)

(३) ट्रेड ॲप्रेंटिस डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट होल्डर) – पात्रता – १२ वी उत्तीर्ण (उमेदवार पदवीधर नसावा.) आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर कोर्स.

(४) ट्रेड ॲप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट – पात्रता – १२ वी उत्तीर्ण. (उमेदवार पदवीधर नसावा.)

(५) ट्रेड ॲप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट (स्किल सर्टिफिकेट होल्डर) – पात्रता – १२ वी उत्तीर्ण (उमेदवार पदवीधर नसावा.) आणि रिटेल ट्रेनी असोसिएट सर्टिफिकेट.

हेही वाचा >>> जानेवारीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागणार! आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; १६ हजार जणांचे आक्षेप

ट्रेड ॲप्रेंटिस – रिटेल सेल्स असोसिएट/ डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठीची एकूण रिक्त पदे – महाराष्ट्र – १२ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६), गुजरात – ४, गोवा – ०, दमण दीव – ०, छत्तीसगड – १, मध्य प्रदेश – २.

(६) ट्रेड ॲप्रेंटिस – फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक व मशिनिस्ट – पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट कोर्स. महाराष्ट्र – ६ (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १), गुजरात – १, गोवा – ०, दादरा नगर हवेली – ०, दमण दीव – ०, कर्नाटक – ५, छत्तीसगड – १, मध्य प्रदेश – १.

(७) टेक्निशियन ॲप्रेंटिस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेशन, सिव्हील, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स – पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा. महाराष्ट्र – ११० (अजा – ११, अज – १०, इमाव – ३०, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ४८), गुजरात – ३०, गोवा – ०, दादरा नगर हवेली – १, दमण दीव – १, कर्नाटक – ५, छत्तीसगड – १५, मध्य प्रदेश – २४.

ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, ट्रेड ॲप्रेंटिस ( DEO/ RSA) व टेक्निशियन ॲप्रेंटिसेस पदांसाठी पात्रता परीक्षेत उमेदवारांना किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य. (अजा/ अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) उमेदवारांनी पात्रता परीक्षा ३० नोव्हेंबर २००० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

उच्च अर्हतेचे शिक्षण घेणारे/ प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी १८ ते २४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

१) सिडको ( CIDCO) महामंडळामध्ये लेखा लिपिकपदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – २३ (अजा – ३, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८) आरक्षित पदे (महिला – ३० टक्के, खेळाडू – ५ टक्के, माजी सैनिक – १५ टक्के, प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, अंशकालीन – १० टक्के, अनाथ – १ टक्के, दिव्यांग – ४ टक्के)

वेतन श्रेणी – एस – ८ (रु. २५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ८७,०००/-.

वयोमर्यादा – (दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी) खुला प्रवर्ग – ४० वर्षे, मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ईडब्ल्यूएस – ४५ वर्षे, दिव्यांग – ४७ वर्षे, माजी सैनिक – ४० वर्षे सैनिकी सेवेचा कालावधी – ३ वर्षं.

पात्रता – बी.कॉम./ बी.बी.ए./ बी.एम.एस. (अकाऊंटन्सी/ फिनान्शियल मॅनेजमेंट/ कॉस्ट अकाऊंटिंग/मॅनेजमेंट अकाऊंटिंग/ ऑडिटिंग विषयांसह) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

निवड पद्धती – २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा (१) मराठी – ५० प्रश्न, २५ गुण; (२) इंग्रजी – ५० प्रश्न, २५ गुण; (३) अकालन क्षमता – ५० प्रश्न, ५० गुण; (४) व्यावसायिक ज्ञान – ५० प्रश्न, १०० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेत पात्रतेसाठी किमान ४५ टक्के गुण मिळविणे आवश्यक.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/- अधिक रु. १८०/- जीएसटी = रु. १,१८०. राखीव प्रवर्ग – रु. ९००/- अधिक रु. १६२/- जीएसटी = रु. १,०६२/-.

शंकासमाधानासाठी https://cgrs.ibps.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्र. १८००२२२३६६/ १८००१०३४५६६ वर संपर्क साधा. महिला आरक्षणाचा दावा करणाऱ्या विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, इमाव, विमाप्र या मागासप्रवर्गातील महिलांनी दि. ८ जानेवारी २०२४ रोजी वैध असलेले नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक. या भरती प्रक्रियेशी संबंधित पुढील सूचना/घोषणा वेळोवेळी सिडकोच्या http://www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ cidcoacjunst/ या संकेतस्थळावर दि. ८ जानेवारी २०२४ पर्यंत करावेत. (Application Registration & gt; Payment of Fees & gt; Document Scan and Upload (१) Passport size colour ( light colour background), Photograph image ( jpg/ jpeg format) (४.५ cm x ३.५ cm) (२०० x २३० pixcel). (२) सिग्नेचर sign on white paper with black ink pen १४० x ६० pixels (१०-२० kb).