● धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयात गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क पदांची सरळ सेवेने भरती. एकूण रिक्त पदे – १७९.
( I) गट-क मधील पदांचा तपशील –
(१) निरीक्षक – (वेतन श्रेणी – एस-१३ (३५,४०० – १,१२,४००)) १२१ पदे (अजा – १३, अज – ७, विजा-अ – ४, भज-ब – ३, भज-क – ५, भज-ड – २, इमाव – १८, विमाप्र – २, साशैमाव – १५, आदुघ – १५, खुला – ३७) (एकूण ५ पदे अपंग प्रवर्गासाठी राखीव) (१ पद अनाथ प्रवर्गासाठी राखीव) (महिलांसाठी – ३६, खेळाडू – ६, मा.सै – १८, पदवीधर अंशकालीन – ११, भूकंपग्रस्त – १, प्रकल्पग्रस्त – ६ पदे राखीव).
पात्रता – पदवी किंवा पदवीपेक्षा कोणतीही उच्च अर्हता.
(२) वरिष्ठ लिपिक – (वेतन श्रेणी – एस-८ (२५,५०० – ८१,१००)) ३१ पदे (अजा – ४, अज – २, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ६, विमाप्र – १, साशैमाव – ४, आदुघ – ४, खुला – ६) (प्रत्येकी १ पद अपंग प्रवर्गासाठी राखीव) (महिलांसाठी – ९, मा.सै – ५, पदवीधर अंशकालीन – २ पदे राखीव).
पात्रता – पदवी आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
( II) गट-ब (अराजपत्रित) मधील पदांचा तपशील –
(३) लघुलेखक कनिष्ठ श्रेणी – (वेतन श्रेणी – एस-१५ (४१,८०० – १,३२,३००)) २२ पदे (अजा – ४, अज – ४, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – २, इमाव – ३, साशैमाव – ३, आदुघ – ३, खुला – ०) (१ पद अपंग अल्पदृष्टी आणि ६ पदे महिला राखीव).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
(४) लघुलेखक उच्च श्रेणी – (वेतन श्रेणी – एस-१६ (४४,९०० – १,४२,४००)) २ पदे (इमाव – १, साशैमाव – १).
(५) विधि सहायक – (वेतन श्रेणी – एस-१५ (४१,८०० – १,३२,३००)) ३ पदे (अजा – १, विजा-अ – १, खुला – १).
पात्रता – विधिमधील पदवी आणि खासगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – ( ३ ऑक्टोबर २०२५ रोजी) १८ ते ३८ वर्षे
निवड पद्धती – परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नं. ७९९६०६५८८८.
जाहिरातीमधील बाबींसंबंधी विचारणा करण्यासाठी ई-मेल आयडी व हेल्पलाईन नंबर – occheadoffice@gmail. com,
०२२-२४९७६४२२, २४९३५४३४, २४९३०४९९.
ऑनलाइन अर्ज https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करावेत.
बँकेत व्यवस्थापक पदे
● पंजाब अँड सिंध बँक ( PSB) – MMGS- II स्केलमधील ‘मॅनेजर’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १९०.
(१) क्रेडिट मॅनेजर – १३० (अजा – १९, अज – ९, इमाव – ३५, ईडब्ल्यूएस – १३, खुला – ५४) (४ पदे अपंग (कॅटेगरी VI, HI, OC, MD/ ID प्रत्येकी १) साठी राखीव).
पात्रता – (दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) अॅग्रकिल्चर मॅनेजर – ६० (अजा – ९, अज – ४, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २५) (अपंग कॅटेगरी VI, OC साठी प्रत्येकी १ पद राखीव).
पात्रता – अॅग्रिकल्चर/ हॉर्टिकल्चर/ डेअरी/अॅनिमल हजबंडरी/ फॉरेस्ट्री/ वेटेरिनरी सायन्स/अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग विषयातील पदवी.
दोन्ही पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६०टक्के गुण आवश्यक. (अजा/अज/अपंग – ५५टक्के गुण)
अनुभव – शेड्यूल्ड कमर्शियल बँकेमधील ऑफिसर पदावरील किमान ३ वर्षांचा अनुभव. (अर्ज करताना अनुभवाचा दाखला (Annexure- I) नमुन्यातील सादर करणे आवश्यक.)
वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी) २० ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १० वर्षे).
वेतन श्रेणी – ऑफिसर MMGS- II (रु. ६४,८२० – ९३,९६०).
उमेदवारांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी आणि २ वर्षांचा बाँड कालावधी पूर्ण करावा लागेल.
निवड पद्धती – लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, पर्सोनल इंटरव्ह्यू, अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम निवड.
लेखी परीक्षा – इंग्लिश भाषा – २० प्रश्न, १५ मिनिटे; जनरल अवेअरनेस – २० प्रश्न, ३० मि.; प्रोफेशनल नॉलेज – ६० प्रश्न, ६० मि.; एकूण १० प्रश्न, १० गुण. वेळ – १०५ मिनिटे. पात्रतेसाठी किमान गुण – खुला, ईडब्ल्यूएस – ४० टक्के, राखीव गट – ३५ टक्के.
उमेदवारांना ऑनलाइन टेस्टमधील गुणांना ७०टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूमधील गुणांना ३०टक्के वेटेज देऊन गुणवत्ता यादी बनविली जाईल.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/अपंग- रु. १००/-; खुला/ईडब्ल्यूएस/इमाव – रु. ८५०/-. याशिवाय कर आणि पेमेंट गेटवे चार्जेस भरावे लागतील. ऑनलाइन अर्ज करण्याविषयी विस्तृत सूचना https://punjabandsindbank.co.in/ या संकेतस्थळावर पॅरा ६ मध्ये उपलब्ध आहेत. याच संकेतस्थळावरील होम पेजमधील Recruitment Link मधून ऑनलाइन अर्ज १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत करावेत.