Premium

Maharashtra HSC Result 2023 Date : इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल

Maharashtra 12th Results 2023 Date and Time : इयत्ता बारावीचा निकाल उद्या (२५ मे) जाहीर होणार!

Maharashtra Board 12th Results 2023 Date and Time
महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल २०२३ तारीख आणि वेळ

Maharashtra Board HSC Results 2023 Date and Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता १२ वीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होत आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahresult.nic.in वर पाहता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्

निकालानंतर काही दिवसांनी गुणपत्रिका मिळतील

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या (गुरुवार, २५ मे) निकाल घोषित केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून गुणपत्रिका (हार्ड कॉपी/ओरिजिनल मार्कशीट) मिळतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-05-2023 at 14:41 IST
Next Story
LinkedIn वर जॉब शोधणे होणार अधिक सोपे! या नव्या टूलमुळे फसवणुकीला लागणार लगाम, एकदा वाचाच…