Nabard Recruitment 2024 : १० वी पास उमेदवारांसाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. नाबार्डने ग्रुप-सी ऑफिस अटेंडंट या रिक्त पदांवरील भरतीबाबत एक अधिसूचना जारी केली आहे, ज्याद्वारे नाबार्डमध्ये १०८ ऑफिस अटेंडंट पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.nabard.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. (Nabard Office Attendant Racruitment 2024)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैक्षणिक पात्रता (Nabard Recruitment 2024 Education Qualification)

नाबार्ड ऑफिस अटेंडंटच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा (Nabard Recruitment 2024 Age Limit)

उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात विशेष सवलत दिली जाईल.

पगार (Nabard Recruitment 2024 Salary)

ऑफिस अटेंडंट पदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना ३५००० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क (Nabard Recruitment 2024 Form Fees)

अर्ज भरण्याबरोबर उमेदवारांना अर्ज शुल्कही जमा करावे लागेल. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ४५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि PH श्रेणीतील उमेदवारांना फक्त ५० रुपये भरावे लागतील.

अशाप्रकारे भरा ऑनलाइन अर्ज (nabard recruitment 2024 How To Apply)

२) आता होमपेजवर NABARD Office Attendant Recruitment 2024 ही लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
३) आता तुमचे नाव, मोबाइल नंबरसह विचारलेली माहिती भरा.
४) आता तुमच्या मोबाइल नंबरवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जाईल.
५) मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पूर्ण अर्ज व्यवस्थित भरा.
६) आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
७) आता अर्ज शुल्क भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
८) अशाप्रकारे अर्ज सबमिट होईल. तुम्ही या अर्जाची प्रत डाऊनलोड करून ठेवू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nabard office attendant recruitment 2024 notification out for 108 vacancies for 10th pass application begin eligibility apply online sjr