● यूपीएससी कंबाईंड जिओसायंटिस्ट एग्झामिनेशन २०२३ मुख्य परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लि. ( MECL), नागपूर (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ माईन्स अंतर्गत पब्लिक सेक्टर एंटरप्राईज)मध्ये ‘एग्झेक्युटिव्ह ट्रेनी’ पदांची भरती.

(१) एग्झेक्युटिव्ह ट्रेनी (जीऑलॉजी) – २० पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८).

● पात्रता – एम.एससी/एम.टेक./एम.एससी.टेक. (जिऑलॉजी/अॅप्लाईड जीऑलॉजी/मिनरल एक्सप्लोरेशन/अर्थ सायन्स/ जीऑलॉजिकल टेक्नॉलॉजी किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी).

(२) एग्झेक्युटिव्ह ट्रेनी (जिओफिजिक्स) – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).

● पात्रता – एम.एससी./एम.टेक./एम.एससी.टेक (जिओफिजिक्स/अप्लाईड जिओफिजिक्स/जिओफिजिकल टेक्नॉलॉजी किंवा समतूल्य पदव्युत्तर पदवी).

यूपीएससीने घेतलेल्या कंबाईंड जिओसायंटिस्ट एग्झामिनेशन २०२५ मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांची यूपीएससीने अंतिम निवडीसाठी शिफारीश केलेली नाही, फक्त असेच उमेदवार MECL मध्ये थेट भरती होण्यास पात्र आहेत. (अशा उमेदवारांनी आपल्या गुणांची माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर शेअरिंगचा पर्याय निवडलेला होता.)

● वयोमर्यादा – (दि. २३ एप्रिल २०२५ रोजी) २८ वर्षे (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

हेही वाचा

● निवड पद्धती – प्राप्त अर्जांमधून प्रत्येक डिसिप्लिनसाठी यूपीएससीद्वारा घेतलेल्या कंबाईंड जिओसायंटिस्ट मुख्य परीक्षा २०२३ मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी बनविली जाईल. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल. कागदपत्र पडताळणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची कंबाईंड जिओसायंटिस्ट मुख्य परीक्षा २०२३ मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी https://www.mecl.co.in/careers.aspx किंवा meclrecruitment.co.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. (निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा अथवा पर्सोनल इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही.)

● ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनी ऑफिसर्सना देशभरातील MECL चे प्रोजेक्ट्स, कंपनीचे ऑफिसेस किंवा एस्टॅब्लिशमेंट्समध्ये नेमणूक दिली जाईल.

कामावर नियुक्त झालेले उमेदवार एक वर्षाच्या प्रोबेशनवर असतील.

● अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस/इमाव – रु. ५००/-. (अजा/अज/दिव्यांग/मा.सै. यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.mecl.co.in या संकेतस्थळावर दि. ५ जून २०२५ पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com