Aahana Srishti Success Story : भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS) या भारत सरकारच्या कार्यकारी शाखेच्या गट A अंतर्गतच्या नागरी सेवा आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेत दिल्ली येथील अहाना सृष्टी हिने ऑल इंडिया रँक ३ मिळवली आहे. बॅकअप प्लॅनमुळे तिचा प्रवास तणावपूर्ण झाला, असे तिने सांगितले आहे. नक्की कसा होता तिचा प्रवास, काय होता तिचा प्लॅन बी जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहाना सृष्टीने तिच्या @Aahana Srishti या लिंक्डइनवर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये यूपीएससी मुलाखतीच्या दिवसापासून ते अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (AJNIFM)मधील तिच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापर्यंतचे फोटो आहेत. आपला इथपर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दलची माहिती तिने दिली आहे. अहाना सृष्टीला भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (२०२४) मध्ये ऑल इंडिया रँक ३ मिळवणे खरोखरच तिच्या स्वप्नांच्या पलीकडे होते. तिने सांगितले की, सुरुवातीला विषयाची समज तपासण्यासाठी तिने परीक्षा दिली होती. तिने ठरवले होते की, जर या परीक्षेत मी यशस्वी झाले नाही, तर मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन आणि जर उत्तीर्ण झाले नाही, तर काही काळाने पीएच.डी. करीन. प्लॅन बी असल्यामुळे या परीक्षेचे ओझे तिला जास्त वाटले नाही. पण, प्लॅन बी ठेवायचा किंवा नाही हे पूर्णपणे तुमच्यावर आहे, असेसुद्धा अहानाने पोस्टमध्ये सांगितले आहे.

‘देव त्यांनाच मदत करतो, जे स्वतःला मदत करतात’ (Success Story) :

अहाना सृष्टीने या काळात तिच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आई, मैत्रिणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवाचे खूप आभार मानले आहेत. या सर्वांशिवाय तिला यश मिळणे शक्य नव्हते, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. अहाना सृष्टीने तिचा अनुभव शेअर करीत असेसुद्धा लिहिले की, अचानक घडणाऱ्या घटना खरोखरच मानवी प्रयत्नांच्या आणि कल्पनेच्या पलीकडे असतात. तिने पुढे, ‘देव त्यांनाच मदत करतो, जे स्वतःला मदत करतात’ ही म्हण आतापर्यंत लक्षात ठेवून, ती इथपर्यंत आली आहे, असे नमूद केले आहे.

अधिकृत नियुक्ती पत्र आल्यानंतर तिने स्वतःचा प्रवास पोस्टद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. तसेच तिने यूपीएससी परीक्षांना बसणाऱ्या इच्छुकांसाठी, “ही पोस्ट वाचून, परीक्षांची तयारी करून, तुमच्या परिश्रम आणि प्रयत्नांशी प्रामाणिक राहा. ते तुम्हाला नक्कीच बक्षीस देतील. तुम्ही जसे ठरवता, तसे होईलच असे नाही”, असेही आवर्जून सांगितले आहे. तसेच तिने काही संसाधने आणि तयारीच्या टिप्स https://lnkd.in/gKsrEfuH या ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे! तिचे विचार ती इतर इच्छुकांसोबत कधी शेअर करू शकेल का, असे तिला वाटायचे. पण, ब्लॉगवर पोस्ट केल्यामुळे मला आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या टिप्स तिने इच्छुकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. तुम्ही लिंक्डइनवर माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा ब्लॉग पोस्टवर टिप्पणी देऊ शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of aahana srishti secured all india rank 3 in the upsc ies exam 2024 asp