Success story of CA Amita Prajapati: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ही कठीण चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा आयोजित करते. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या आयसीएआय सीएसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. अशीच कहाणी अमिता प्रजापतीची आहे, जिने २०२४ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. १० वर्षांच्या कठोर परिश्रम आणि अढळ दृढनिश्चयानंतर एका तरुणीचे स्वप्न अखेर सत्यात उतरले, जे अशक्य वाटत होते ते अखेर शक्य झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोपडपट्टीत राहणाऱ्या अमिताचा सीए होण्यापर्यंतचा प्रवास

अमिताने लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये तिचा प्रवास शेअर केला. सरासरीपेक्षा कमी दर्जाची विद्यार्थिनी म्हणून लेबल लावले जात असूनही, तिने मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केले. तिच्या पालकांना, जे उदरनिर्वाहासाठी चहा विकायचे, त्यांना अनेक लोकांकडून टीका आणि संशयाचा सामना करावा लागला.

‘तुमची मुलगी सीए होऊ शकणार नाही’

अमिताच्या वडिलांनी तिच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याच्या निर्णयावर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते झोपडपट्टीत राहत असल्याने घर बांधण्यासाठी पैसे वाचवा असे सल्ले दिले. लोक म्हणाले, ‘तुमची मुलगी सीए होऊ शकणार नाही.’ तुम्ही तुमच्या मोठ्या झालेल्या मुलींसोबत गल्ली-बोळात किती काळ राहणार? ती एके दिवशी निघून जाईल आणि तुमच्याकडे मग काहीही उरणार नाही.’

व्हिडीओ व्हायरल झाला

तिच्या प्रवासाचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अमिताचे वडील तिच्या यशाची बातमी ऐकून भावूक होताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतंय की, ती तिच्या वडिलांना मिठी मारते तेव्हा दोघांचे डोळे आनंदाश्रूंनी भरलेले असतात. हा व्हिडीओ नंतर अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आणि व्हायरल झाला.

अमिताची कहाणी प्रेरणादायी

अमिताची कहाणी आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीतही जर आपण हिंमत गमावली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिलो तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. तिच्या पालकांनीही अडचणी असूनही तिला साथ दिली, हे त्याचे एक उदाहरण आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of amita prajapati daughter of tea seller became ca cracked chartered accountants exam dvr