Success Story Of Manu Garg : जिथे इच्छा तिथे मार्ग असे अनेकदा म्हटले जाते. अनेक जण सरकारी नोकरीसाठी निवड होण्याआधी देण्यात येणाऱ्या परीक्षांना घाबरतात. पण, काही जण दोन ते तीन वेळा परीक्षेत नापास झाले तरी पुन्हा पुन्हा परीक्षा देतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने दृष्टिहीन असूनही यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत ९१ वा क्रमांक पटकवला.

अवघ्या २३ वर्षांच्या मनू गर्गने दृष्टिहीन असूनही यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये तो ९१ व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाला आहे. आठवी इयत्तेत असताना अनुवांशिक विकारामुळे त्याच्या प्रवासात अनेक अडथळे आले. त्याला दररोजची कामे करणेसुद्धा कठीण झाली. पण, त्याचा पाठिंबा त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरला. त्याची आई तासनतास त्याच्या शेजारी बसून मोठ्याने धडे वाचायची आणि प्रत्येक गोष्ट त्याला समजते आहे ना याची खात्रीसुद्धा करायची.

हायस्कूल पूर्ण केल्यानंतर मनू गर्गने स्वतंत्रपणे तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. अभ्यास करण्यासाठी तो ऑडिओ बुक्स, स्क्रीन रीडर्स आणि फोनवरील टॉकबॅक वैशिष्ट्यावर अवलंबून होता. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये त्याच्या दृढनिश्चयाला यश आले, जिथे तो राज्यशास्त्र विषयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मनू गर्ग याने १५० हून अधिक स्पर्धा जिंकून तो एक प्रसिद्ध वादविवादक (celebrated debater) देखील बनला.

व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोट्स पाठवल्या (Success Story)

जेव्हा मनू आणि त्याची आई पहिल्यांदा फिजिक्सवाल्लाहच्या आयएएस कोचिंग प्रोग्राममध्ये सामील झाले, तेव्हा त्यांना काय अपेक्षा करावी हे माहीत नव्हते. पण, मनू गर्गचे अथक प्रयत्न नेहमीच पुढे जाण्याचे मार्ग शोधत राहिले.

कोविड-१९ महामारीच्या काळात मनूची नागरी सेवेत सामील होण्याची महत्त्वाकांक्षा वाढली. पण, दृष्टिहीन विद्यार्थी म्हणून यूपीएससी परीक्षेची तयारी करताना काही आव्हाने आली, विशेषतः बहुतेक अभ्यास साहित्य उपलब्ध नसल्यामुळे. मनू गर्गने विविध उपाय शोधण्यास सुरुवात केली. मित्रांनी त्याला व्हॉट्सॲपवर व्हॉइस नोट्स पाठवल्या, ज्या त्याने पीडीएफमध्ये रूपांतरित केल्या आणि टॉकबॅक वापरून ऐकल्या. त्याची आई त्याच्या सोबत राहिली, ती त्याला ऑडिओ नोट्स वाचण्यास मदत करू लागली.