शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे तर तुम्ही ऐकलच असेल. एखाद्या व्यक्तीमध्ये शिकण्याची क्षमता असते तेव्हा वय महत्त्वाचे नसते. ७९ वर्षांच्या आजींनी हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. बऱ्याचदा, एका विशिष्ट वयानंतर, लोक काहीतरी नवीन शिकायचं तर सोडाच पण ते करत असलेले कामदेखील सोडून निवृत्त होतात. पण या जगात असे काही लोक आहेत ज्यांना काम करायला इतके आवडते की ते त्यांचे वय पाहतही नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतःला योद्धा म्हणवतात उषा रे

आज, आपण एका ७९ वर्षीय आजींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या त्यांच्या नोकरीसोबतच एमबीए करत आहे. या आजी पुण्याच्या आहेत. त्यांचे नाव उषा रे आहे. त्या एमबीए पदवी मिळवणाऱ्या जगातील सर्वात वयस्कर महिला बनणार आहे. रिपोर्टनुसार उषा रे स्वतःला योद्धा म्हणवतात.

जगभर प्रवास केला

मिळालेल्या माहितीनुसार, उषा रे यांनी हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्या पुण्यातील डीवाय पाटील विद्यापीठ सेंटर फॉर ऑनलाइन लर्निंगमधून त्यांचा कोर्स करत आहेत. याशिवाय, त्या लखनऊच्या लवी शुभ हॉस्पिटलच्या अकाउंट्स आणि अॅडमिनिस्ट्रेशन विभागातही काम करतात. या वयातही त्यांच्यात इतकी ऊर्जा शिल्लक आहे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते.

उषा रे म्हणतात की, शिकवल्यानंतर आणि जगभर प्रवास केल्यानंतर, मी पुन्हा विद्यार्थी म्हणून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यांना ‘खाली दिमाग शैतान का घर’ असतं असं वाटतं. घरी बसून राहण्यात काही अर्थ नाही. कामानंतर संध्याकाळी मी मोकळी असायचे, म्हणून मी विचार केला कीआपण काहीतरी करायला हवे. म्हणून त्यांनी एमबीए पदवी घेण्याचा निर्णय घेतला.

उषा रे यांची पदवी

उषा रे यांनी १९६६ मध्ये प्राणीशास्त्रात एम.एससी आणि १९७८ मध्ये एम.एड. केले. त्यानंतर त्यांनी भारतातून तसेच भारताबाहेरही टीचिंगचा कोर्स केला. २००३ मध्ये, त्यांना स्टेज-४ कर्करोगाचे निदान झाले. पण त्यांनी या आजारावरही मात केली. जर उषा रे यांनी एमबीए पूर्ण केले तर त्या एमबीए करणाऱ्या जगातील सर्वात वयस्कर महिला ठरतील.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of usha ray oldest mba student learning at the age of 79 studies along with job dvr