Success Story: डॉ. आझाद मूपेन यांचा प्रवास एक सामान्य डॉक्टर ते जागतिक आरोग्य सेवा उद्योजक, असा आहे. १९८७ साली डॉ. मूपेन यांनी दुबईमध्ये ‘एस्टर डीएम हेल्थकेअर’ची स्थापना केली. आज त्यांची कंपनी अनेक देशांमध्ये २७ हून अधिक रुग्णालये, १२५ दवाखाने व ५०० ​​फार्मसी चालवते. त्यांची एकूण संपत्ती ८,४०० कोटी रुपये आहे. त्यामुळे त्यांनी आता संयुक्त अरबमधील सर्वांत श्रीमंत भारतीयांमध्ये स्थान मिळविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. आझाद मूपेन यांचे बालपण

डॉ. आझाद मूपेन यांचा जन्म १९५३ मध्ये केरळमधील कल्पकंचेरी येथे झाला. एमबीबीएसमध्ये त्यांनी चांगले यश मिळवले. त्यानंतर त्यांनी कालिकत वैद्यकीय महाविद्यालयामधून एमडीची पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून छातीच्या आजारासंबंधीची पदविका मिळवली. त्यानंतर कालिकत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्याख्याता म्हणून काम केल्यानंतर ते १९८७ मध्ये दुबईला गेले. तेथे त्यांनी स्वत:चा दवाखाना सुरू केला. ही Aster DM Healthcare ची सुरुवात होती.

डॉ. मूपेन यांनी दुबईत दोन बेडरूमची अपार्टमेंट भाड्याने घेतली होती. तेथून त्यांनी आपल्या दवाखान्याचा पाया उभारला. हळूहळू Aster DM Healthcare हे एक प्रसिद्ध नाव बनले. आज त्यांची ही कंपनी भारत, मध्य पूर्व व आफ्रिकेसह नऊ देशांमध्ये ३७७ हून अधिक प्रतिष्ठान चालवते. Aster, Medcare, Access, MIMS व DM WIMS यांसारखे ब्रॅण्ड समूहाच्या नेटवर्कचा भाग आहेत. कंपनीत २०,००० हून अधिक लोक काम करतात.

हेही वाचा: Success Story : सायकलवरून पदार्थ विकून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली तब्बल ५,५३९ कोटींची कंपनी

‘पद्मश्री’, ‘प्रवासी’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित

डॉ. मूपेन यांचे भारतातील अनेक मोठ्या रुग्णालयांच्या उभारणीत योगदान आहे. त्यांनी आजपर्यंत गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत. भारत सरकारनेही त्यांचे योगदान मान्य केले आहे. त्यांना पद्मश्री आणि प्रवासी या भारतीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२४ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे ८,४०० कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे ते UAE मधील सर्वांत श्रीमंत भारतीयांपैकी एक ठरले आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story started work from a rented house and built a wealth of 8400 crores sap