UPSC CAPF Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत जवळपास ५०६ रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन UPSC CAPF 2024 परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता.

UPSC द्वारे या दलांमध्ये भरती केली जात आहे?

सीमा सुरक्षा दल (BSF) : १८६ पदे
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) : १२० पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) : १०० पदे
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) : ५८ पदे
सशस्त्र सीमा बल (SSB) : ४२ पदे

सहायक कमांडंट पदासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रता :

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत.

वयाची अट :

०१ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत २० ते २५ वर्षे SC/ST: ०५ वर्षे सूट;
OBC : ०३ वर्षे सूट

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्जासह भरावयाचे शुल्क :

जनरल/ ओबीसी – २०० रुपये
एससी, एसटी, महिला – शुल्क नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

१४ मे २०२४

लेखी परीक्षा :

०४ ऑगस्ट २०२४

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी लिंक

https://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :

https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

UPSC CAPF 2024 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

प्रथमच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://upsconline.nic.in/ या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करून वन-टाइम नोंदणी (OTR) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ओटीआर पूर्ण केल्यानंतर ते अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी UPSC CAPF किंवा आयोगाने घेतलेल्या इतर कोणत्याही परीक्षेसाठी OTR पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. असे उमेदवार त्यांच्या नोंदणीचे तपशील देऊन अर्ज भरू शकतात.