SEBI proposed new investment model : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ ) भोजशाला मंदिराचा वाद

मध्यप्रदेशातील भोजशाला मंदिर किंवा कमाल मौला मशीद हे संकुल १९९२ पासून-अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यापासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. या संपूर्ण संकुलाला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत संरक्षित वास्तूचा दर्जा होता. हिंदूधर्मीय हे स्थळ वाग्देवीचे (सरस्वती) मंदिर मानतात, तर मुस्लिम धर्मीय कमाल मौला मशिदीचे ठिकाण मानतात.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्यपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास आणि कला व संस्कृती या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

भोजशाला मंदिर कुठं आहे?
भोजशाला मंदिराचा वाद नेमका काय आहे?
भोजशाला मंदिराचा इतिहास काय?

तुमच्या माहितीसाठी :

१८२२ साली इंग्रज लेखक जॉन माल्कम आणि १८४४ साली मेजर जनरल विल्यम किनकेड यांच्या लिखाणात वादग्रस्त जागेवरील कमाल मौला मशिदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या लेखकांनी राजा भोजाविषयीच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करताना भोजशाळेचा उल्लेख केलेला नाही.

परंतु रॉयल एशियाटिक सोसायटीने प्रकाशित केलेल्या मायकेल विलिसच्या २०१२ च्या शोधनिबंधात, भोजशाळा (भोज हॉल) हे राजा भोजाशी संबंधित संस्कृत अभ्यासाचे केंद्र होते. विलिस यांनी नमूद केले की कमाल अल-दीन चिश्तीच्या कबरीला लागून असलेली मशीद २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून भोजशाळा म्हणून ओळखली जात होती आणि ती धार्मिक, सामाजिक आणि राजकीय तणावाचा केंद्रबिंदू ठरली होती.

“धार, भोज अॅण्ड सरस्वती: इंडोलॉजी टू पॉलिटिकल मिथॉलॉजी अॅण्ड बॅक” या शीर्षकाच्या शोधनिबंधात विलिसने भारतीय पुरातत्त्व खात्यासाठी काम केलेले जर्मन इंडोलॉजिस्ट, Alois Anton Fuhrer यांनी दिलेला भोजाचा पहिला संदर्भ दिला आहे. १८९३ साली फ्युहररने मध्य भारतात प्रवास केला होता, त्याने मशीद संकुलाची नोंद भोजशाळा म्हणून केली आहे.

धारची ओळख ही माळव्याचा राजा बाज बहादूर आणि रूपमती यांच्या प्रेमकथेसाठी होती. परंतु धार लवकरच जातीय राजकारणाच्या छायेत आले. हे राजकारण आजही भोजशाळेभोवती फिरते आहे. १९५२ साली या ठिकाणी पहिल्यांदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्या वर्षी हिंदूंनी भोज दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुस्लिमांनी १९५३ साली उर्स (सूफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांची पुण्यतिथी) साजरी करण्याचे ठरवले. तर पुढील काही दशकांमध्ये मुस्लिम शुक्रवारी या ठिकाणी नमाज अदा करत होते, तर हिंदू वसंत पंचमी साजरी करण्यासाठी एकत्र येत होते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

भोजशाला मंदिरावरून वाद नेमका कशासाठी? इतिहास काय सांगतो?

२) ‘सेबी’चा प्रस्तावित नवीन गुंतवणूक प्रकार

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया आणि वैयक्तिक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून (पीएमस) या नवीन गुंतवणूक प्रकाराची रचना आणि मालमत्ता वाटप याबाबत अभिप्राय मागवला आहे. पुढील महिन्यात ६ ऑगस्टपर्यंत सूचना आणि अभिप्राय सादर केला जाणार आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील अर्थशास्त्र या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

सेबी ही संस्था नेमकी काय?
‘सेबी’चा प्रस्तावित नवीन गुंतवणूक प्रकार काय आहे?

तुमच्या माहितीसाठी :

‘सेबी’ने अधिक परताव्यासाठी उच्च जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन मालमत्ता वर्ग प्रस्तावित केला आहे. नवीन प्रस्तावित गुंतवणूक प्रकार म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवेतील (पीएमएस) मध्यममार्ग असेल. म्युच्युअल फंडापेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता आहे, मात्र पीएमएस फंडामध्ये गुंतवणुकीसाठी ज्या गुंतवणूकदारांची पात्रता नाही त्यांच्यासाठी हा नवीन गुंतवणूक प्रकार सेबीने प्रस्तावित केला आहे.

म्युच्युअल फंड आणि पीएमएस या दोन्ही गुंतवणूक प्रकारांमध्ये मोठे अंतर आहे. म्युच्युअल फंडात अगदी १०० रुपयांपासून एसआयपी करता येते तर पीएमएसमध्ये गुंतवणुकीसाठी किमान गुंतवणूक आकार ५० लाख रुपये अनिवार्य आहे.

‘सेबी’ने प्रस्तावित केलेल्या नवीन गुंतवणूक प्रकारामध्ये, किमान गुंतवणूक १० लाख रुपये व त्यापुढे असेल. या नवीन गुंतवणूक साधनांमध्ये उच्च जोखीम असेल आणि म्युच्युअल फंड घराणे किंवा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना त्यातील जोखमीबाबत गुंतवणूकदारांना आधीच कल्पना देणे आवश्यक आहे.

या नवीन मालमत्ता वर्गांतर्गत, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या दीर्घ तसेच अल्पावधीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीज यांसारख्या उच्च जोखमीच्या रणनीतीचे पर्याय गुंतवणूकदारांना देऊ शकतील. ज्यातून इक्विटी अर्थात समभाग संलग्नसाधनांमध्ये दीर्घ आणि अल्पावधीच्या ‘पोझिशन्स’ घेऊन वाढीव परतावा देण्याचा प्रयत्न करतील.

एकंदरीत गुंतवणूकदारांना हेजिंग आणि रिबॅलेंसिंगव्यतिरिक्त इतर मालमत्ता वर्गामध्ये म्हणजेच वायद्यांमध्ये (डेरिव्हेटिव्ह) गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. शिवाय म्युच्युअल फंडांना परवानगी उच्च जोखमीच्या असलेल्या सर्व गुंतवणूक या नवीन मालमत्ता वर्गासाठी उपलब्ध असतील. गुंतवणूकदारांना उच्च जोखीम घेण्याची क्षमता आणि मोठ्या रकमेवर गुंतवणूक उत्पादन प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

‘सेबी’चा प्रस्तावित नवीन गुंतवणूक प्रकार कोणासाठी आणि काय आहे?

UPSC-MPSC : ‘सेबी’ची स्थापना करण्याची गरज का भासली? तिची उद्दिष्टे आणि कार्ये कोणती?

यूपीएससी संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…