UPSC Recruitment 2023 Apply Online: भारत सरकारमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरसह अन्य पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसंबधीत योग्यता असणाऱ्या सर्व उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. जे उमेदवार या पदांवर अर्ज करू इच्छितात ते यूपीएसच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
UPSC भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये १८ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे.
या पदांवर होईल भरती
डेंजरस गुड्स इंस्पेक्टर: ३ पदे
फोरमन (रसायन): १ पद
फोरमन (धातुकर्म- Metallurgy)): १ पद
फोरमैन (टेक्सटाइल): २ पद
डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर (फोरेंसिक सायन्स): १ पद
डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर (लेक्चरर): १ पद
असिस्टेंट पब्लिक प्रॉसिक्यूटर: १ पद
यूनानी फिजिशियन: २ पद
हेही वाचा – FTII पुणे येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्यांनी खाली दिलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या सहाय्याने शैक्षणिक योग्यत आणि वयोमर्यादा तपासून घ्यावी.
हेही वाचा – ‘या’ उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी! पदानुसार ६० हजारांहून अधिक पगार मिळणार
अशी आहे निवड प्रक्रिया
भरतीसाठी निवड परिक्षा आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. अशा परिस्थितींमध्ये जिथे मुलाखतीनंतर भरती परिक्षाद्वारे केले जाते. उमेदवारांना मुलाखतीसाठी संबधित क्षेत्रात श्रेणीमध्ये कमीत कमी योग्यता असणे आवश्यक आहे.
UPSC Recruitment 2023 नोटिफिकेशन – https://upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-18-2023-engl-220923_0.pdf
UPSC Recruitment 2023 अर्ज करण्याची लिंक – https://upsc.gov.in/
अर्ज शुल्क किती आहे
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये द्वावे लागेल आणि महिला/एससी/एसटी/बेंचमार्क अपंगत्व असणारे उमेदवारांना अर्जमध्ये शुल्कामध्ये सुट दिली आहे. अर्ज शुल्क एसबीआयच्या कोणत्याही शाखेमध्ये रोख किंवा कोणत्याही बँकेत नेट बँकिग सुविधा वापरून करू शकता आणि व्हिस३/ मास्टर/ रुपये/क्रेडिट/ डेबिट कार्ड/ यूपीआयचा वापर करून अर्ज शुल्क भरू शकता.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc recruitment 2023 apply for 18 assistant public prosecutor other posts at upsc gov in snk