World Bank Internship 2025 : जर तुम्हीही वर्ल्ड बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी वर्ल्ड बँकेने इंटर्नशिपसाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. या इंटर्नशिप अंतर्गत उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पना अमलात आणण्याच्या विविध गोष्टींमध्ये रिसर्च करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला तासाभराच्या आधारावर पगार मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वेळेचा प्रभावी वापर करण्याबरोबर एक व्यावसायिक अनुभवदेखील मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हालाही या इंटर्नशिपसाठी १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करावा लागेल. पण, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही यासाठी लागणारी वयोमर्यादा, पात्रता निकष आणि कामाची व्याप्ती यांविषयीची माहिती करून घ्या.

वर्ल्ड बँकेच्या इंटर्नशिप अंतर्गत कामाची व्याप्ती

या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रोफेशनल आणि टेक्निकल क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे:

इकोनॉमिक्स अँड फायनान्स
मानवी विकास (सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसंख्या)
ह्यूमन डेव्हलपमेंट (पब्लिक हेल्थ, एज्युकेशन, न्यूट्रिशन आणि पॉप्युलेशन)
ॲग्रिकल्चर अँड एनवायरनमेंट ,
इंजिनिअरिंग अँड अर्बन प्लानिंग,
नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट,
प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट सपोर्ट (अकाउंटिंग, कम्युनिकेशन, ह्यूमन रिसोर्सेज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड फायनान्स)

जागतिक बँकेत इंटर्नशिपसाठी पात्रता निकष (World Bank Internship 2025: Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा रेग्युलर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

भाषा कौशल्ये : इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. याशिवाय फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

टेक्निकल स्किल : कॉम्प्युटिंग आणि टेक्निकल स्किल असणे आवश्यक आहे.

जागतिक बँक इंटर्नशिप स्टायपेंड (World Bank Internship 2025 Stipend)

स्टायपेंड : वर्ल्ड बँक त्यांच्या इंटर्नना प्रति तास स्टायपेंड (विद्यावेतन) देते.
प्रवास भत्ता : मॅनेजरने ठरवल्याप्रमाणे, US$3,000 (अंदाजे रु.२६०५९०) पर्यंतचा प्रवास खर्च दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये ड्युटी स्टेशन शहराला जाण्यासाठी आणि येण्यासाठी विमान भाडे समाविष्ट असू शकते.
राहण्याची व्यवस्था : इंटर्नना स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल.

अशी असेल निवड प्रक्रिया (World Bank Internship 2025 Selection Process)

माहिती : निवडलेल्या उमेदवारांना मार्च २०२५ च्या अखेरीस कळवले जाईल.
मुलाखत : निवडलेल्या उमेदवारांना मुलाखत फेरीतून जावे लागेल.
अंतिम निवड : अंतिम निवड एप्रिल २०२५ मध्ये केली जाईल.
इंटर्नशिपची सुरुवात : हा प्रोग्राम मे २०२५ च्या सुरुवातीला सुरू होईल आणि ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहील.

इच्छुक उमेदवारांना त्यांचा बायोडेटा, इंट्रेस्ट डिटेल्स आणि पदवी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना एक अधिकृत ईमेल मिळेल. निवडलेल्या उमेदवारांना मार्चच्या अखेरीस कळवले जाईल. बहुतेक इंटर्नशिप पदे वॉशिंग्टन डीसीमध्ये आहेत, तर काही वर्ल्ड बँकेच्या विविध देशांमधील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.

अर्ज कसा करावा? World Bank Banking Internship Programme 2025: Application Process

१) इच्छुक उमेदवारांना वर्ल्ड बँकेची अधिकृत वेबसाईट http://www.worldbank.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

२) अर्ज करण्यासाठी उमेदवारास बायोडेटा, ट्रेस्ट डिटेल्स आणि पदवी प्रमाणपत्र आणि इतर तपशील अपलोड करावे लागतील.

३) ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी आहे, पण ती तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करावी लागेल.

४) या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन, तुम्हाला केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवच मिळणार नाही तर तुमच्या करिअरची एक नवीन दिशा निश्चित करता येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World bank internship 2025 opportunity for graduates check eligibility stipend application process others details sjr