नवा ‘जीवनगुरू’?
नावाप्रमाणे हे अॅप एखाद्या व्यक्तीला ‘मोटिव्हेट’ अर्थात प्रोत्साहित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात, त्या
वेळेचं व्यवस्थापन
वेळेचं व्यवस्थापन ही आजच्या काळातील महत्त्वाची गोष्ट बनली आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या कामांचं वेळेनुसार नियोजन
करणं आवश्यक आहे. यासाठी अनेकदा मोठी माणसे दिमतीला सेक्रेटरी ठेवतात तर, सर्वसामान्य माणूस एखाद्या डायरीत किंवा डोक्यातच या गोष्टींची नोंद करून ठेवतो. पण विसरभोळा गोकुळ ज्याप्रमाणे उपरण्याला स्मरणगाठी मारतो, पण कोणती गाठ कसली याची आठवण त्याला राहात नाही, त्याचप्रमाणे डायरीत कधी काय आहे हे पाहण्याचं भान आपल्याला राहात नाही. अशा वेळी कुणीतरी आठवण करून द्यावी, असं वाटत असेल तर ‘टू डू कॅलेंडर प्लॅनर’ To-Do Calendar Planner) हे अॅप नक्कीच उपयोगी ठरू शकेल. या अॅपमध्ये तुम्ही दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक कामांची नोंद करू शकता. त्यानुसार हे अॅप तुम्हाला स्मरण करून देतं. याशिवाय तुमच्या समोरील ध्येय आणि त्यासाठी करायची कामे यांची नोंद करून तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात का, हे तपासण्याची सुविधाही या अॅपमध्ये आहे. एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास त्या ठिकाणचे ‘गुगल मॅप लोकेशन’देखील तुम्ही आधीच ‘सेव्ह’ करून ठेवू शकता. त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला शोधाशोध करावी लागत नाही. मित्रमंडळींचे वाढदिवस, महत्त्वाचे दिन, मुलाखतीची वेळ किंवा बिल भरायची तारीख या सगळ्यांची नोंद तुम्ही या अॅपमध्ये करू शकता.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com