X

दीप सिद्धू हा भाजपाचा कार्यकर्ता, पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो आहे – राकेश टिकैत

ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग असणार नाहीत, असंही म्हणाले

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना काल राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेला हिंसाचार धक्कादायक होता. या हिंसाचाराता सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाबरोबरच ८६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, आतापर्यंत १५गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर, ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील अन्य घुमटावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले. दरम्यान, शेतकऱ्यांना चिथवण्यामागे कोण आहे याच शोध घेतला जात असताना, दीप सिद्धू हे नाव समोर आलं आहे.

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा हिंसाचार : १५ गुन्हे दाखल, ८६ पोलीस जखमी

दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भाजपा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

“दीप सिद्धू हा शीख नसून तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो देखील आहे. ही शेतकर्‍यांची चळवळ आहे आणि तशीच राहील. काही लोकांनी त्वरित हे ठिकाण सोडले पाहिजे – ज्यांनी बॅरिकेडिंग तोडली ते कधीच आंदोलनाचा भाग होणार नाहीत.” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.

तसेच, दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेला हिंसाचार घडवणारे राजकीय पक्षांचे लोक आहेत. त्यांचा शेतकऱ्यांचा आंदोलन बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप देखील काल भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला होता.

शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?

“हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे,” असं राकेश टिकैत म्हणाले होते.

22
READ IN APP
X