scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: "प्रसिद्धीचीसुद्धा एक नशा चढते", भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: “प्रसिद्धीचीसुद्धा एक नशा चढते”, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. “जरांगे कधी हॉस्पिटलमध्ये असतो तर…

Dr harsh Vardhan quits bjp politics
लोकसभेसाठी तिकीट कापल्यानंतर माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणालाच राम-राम

भाजपाने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये काही जणांचे तिकीट कापण्यात आले आहे. दिल्लीतील चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून माजी…

solapur, carrots thrown on vehicle of madha mp ranjitsinh naik nimbalkar
माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर चक्क गाजरांचा पाऊस

माढा लोकसभा मतदारसंघात पाच वर्षात तब्बल एक लाख कोटी रूपयांचा विकास निधी आणल्याचा दावा करणारे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना…

Pawan Singh BJP Lok Sabha polls
भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

BJP Candidate First List : भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी…

central minister nitin gadkari marathi news, bjp lok sabha candidates list marathi news
भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

पक्षातील ज्येष्ठता आणि मंत्री म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेता लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश अपेक्षित होता. पक्षाच्या नेत्यांनी…

What Uddhav Thackeray Said?
“भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही, पण बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या..”, उद्धव ठाकरेंचा टोला

भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही पण कृपाशंकर सिंह यांचं आहे यावरुन उद्धव ठाकरेंचा टोला

Manoj Jarange on Devendra Fadnavis: "फडणवीसांनी मला अटक करून दाखवावी", जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange on Devendra Fadnavis: “फडणवीसांनी मला अटक करून दाखवावी”, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं आणि उपोषणांनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली…

मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा! | Manoj Jarange on Fadnavis
मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा! | Manoj Jarange on Fadnavis

मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा! | Manoj Jarange on Fadnavis

Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?
Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एनडीएत घरवापसी केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

rajasthan
Loksabha Poll 2024 : भाजपाकडून राजस्थानमधील १५ जागांसाठी उमेदवार जाहीर; ‘या’ तीन जागांवर करावा लागू शकतो आव्हानांचा सामना!

भाजपाने कोटामधून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, नागौरमधून ज्योती मिर्धा यांना, तर बांसवाडामधून महेंद्रजीत सिंग मालवीय यांना उमेदवारी दिली आहे.

latur bjp marathi news, latur bjp lok sabha election 2024
लातूरमध्ये गटबाजी रोखण्याचे भाजपपुढे आव्हान

लातूर जिल्ह्यात२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची घसरण सुरू झाली. गटातटात भाजप मोठ्या प्रमाणावर विखुरल्याचे चित्र स्पष्ट झाले. अहमदपूर व उदगीर…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×