पाकिस्तानात वायव्य भागात भूकंपाचे धक्के बसले असून त्यात १५ जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर होती. इस्लामाबाद, रावळपिंडी, मनशेरा, मुरी, अबोटाबाद, स्वात, हरिपूर, मलकंद, नौशेरा, शांगला हिल, बट्टाग्राम येथे हे धक्के जाणवले.
भूकंपाने मातीची कच्ची घरे कोसळून पाचजण जखमी झाले आहेत. बट्टाग्राम येथे मातीचे घरे कोसळून नऊ जण जखमी झाले असून, सहा जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारण तीन ते पाच सेकंद हा भूकंप जाणवला असून त्याचे केंद्र ३२ मीटर खोलीवर होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तानातील भूकंपात १५ जखमी
पाकिस्तानात वायव्य भागात भूकंपाचे धक्के बसले असून त्यात १५ जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर होती.
First published on: 28-02-2015 at 02:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 injured as magnitude 5 4 quake jolts parts of pakistan