Dehradun Car Hit And Run Case 22 year old Arrested : डेहराडूनच्या मसूरी रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत दोन जण जखमी देखील झाले आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी एका २२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चंदीगड येथील नोंदणी क्रमांक असलेल्या एक मर्सिडीज कारने चार पादचाऱ्यांना आणि एका स्कूटरला उडवल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान पोलिसांना या प्रकरणी गाडी चालवणाऱ्या वंश कात्याल नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

अपघातानंतर सहस्त्रधरा येथे एका रिकाम्या जागेतून ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. स्थानिक लोकांशी चौकशी केल्यानंतर जवळच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या ओळखीच्या कात्यालने गाडी तिथे पार्क केली असल्याची माहिती दिली.

“त्या व्यक्तीने सांगितले की घटना घडली त्या रात्री कात्यालने त्याला फोन केला आणि गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. तसेच त्याने त्या व्यक्तीचे स्कूटर मागून घेतली आणि त्याच्या पुतण्याला जाखान येथे सोडायला गेला. त्याच्या पुतण्याला सोडल्यानंतर, कात्यालने स्कूटर परत केली आणि निघून गेला,” असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंह म्हणाले.

कात्यालचा मेहुणा आणि वाहन मालक जतिन प्रसाद वर्मा यांनी यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देहरादूनमधील आयएसबीटीजवळ कात्यालचा शोध घेतला आणि त्याला अटक केली, असे सिंह म्हणाले.

चौकशीदरम्यान कात्यालने कबुल केलं की तो मूळचा मोरादाबादचा आहे आणि बीबीएची पदवी घेतल्यानंतर तो दिल्ली येथे काम करत होता. मात्र त्याची नोकरी गेल्यानंतर तो देहरादून येथे कामाच्या शोधात आला. तो मोहित विहार येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. बुधवारी तो त्याच्या मेव्हण्याच्या मर्सिडीज गाडीमध्ये त्याच्या पुतण्याबरोबर राजपूरकडे फिरायला गेला. जेव्हा तो जाखान येथे परत येत होता, तेव्हा दोन स्कूटर त्याच्या कारसमोर आल्या आणि त्याने कारवरील नियंत्रण गमावले आणि त्याने स्कूटरच्या मागील बाजूला धडक दिली आणि चार पादचाऱ्यांना देखील उडवले, असेही पोलिस म्हणाले.

आरोपी कसा सापडला?

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकगनीशन (एएनपीआर) कॅमेऱ्याने संशयिताच्या गाडीचा शोध घेतला. फुटेजनुसार सारखीच दिसणारी ११ वाहने अपघात घडला त्या ठिकाणाहून गेल्याचे दिसून आले. यापैकी सील्व्हर ग्रे रंगाच्या मर्सिडिज कारला थोडे नुकसान झाल्याचे दिसून आले.

अधिक चौकशी केल्यानंतल हे वाहन हरबीर ऑटोमोबाइल्स या नावाने रजिस्टर असल्याचे आढळून आले. या कंपनीचे महिंद्रा शोरूम चंदीगड येथे आहे. यानंतर चंदीगड येथे पोलिसांना चौकशी केली असता हरबीर ऑटोमोबाइल्सने ही कार फेब्रुवारी २०२३ मध्ये विकत घेतली आणि नंतर दिल्लीतील डिलरला जून २०२३ मध्ये विकल्याची माहिती मिळाली.

चौकशीत असे दिसून आले की त्यांनी ते वाहन दुसऱ्या डीलरशिपकडे ट्रान्सफर केले होते, जेथून जाखानमध्ये घर आणि ऑफिस असलेले लखनऊचे रहिवासी जतिन प्रसाद वर्मा यांनी २०२४ मध्ये ते खरेदी केली होती. वर्मा व्यवसायासाठी वारंवार डेहराडूनला जात असल्याचे आढळून आले.

तसेच डेहराडूनमधील अधिकृत मर्सिडीज-बेंझचे सर्व्हिस सेंटर असलेल्या बर्कले मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे चौकशी केली असता कारची २९ नोव्हेंबर २०२४ रोजी येथे सर्व्हिसिंग झाल्याचे समोर आले आणि ती जतिन प्रसाद वर्मा यांच्या नावाने रजिस्टर होती, असे एसएसपी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 year old arrested after 4 labourers crushed to death by speeding mercedes 2 seriously injured rak94