लंडन : ‘पॅलेस्टाईन ॲक्शन’ या गटाला दहशतवादी गट ठरविण्याला विरोध करण्यासाठी आयोजित आंदोलनात अनेक पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा पोलिसांनी निषेध केला. या झटापटीत ४२५ आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या अंगावर थुंकण्यात आले.
ब्रिटनने ‘पॅलेस्टाईन ॲक्शन’वर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शनिवारी ‘पार्लमेंट स्क्वेअर’च्या ठिकाणी आंदोलन केले. शेकडो आंदोलक या ठिकाणी जमले होते. पॅलेस्टाइनच्या बाजूने या वेळी घोषणा करण्यात आल्या. ऑगस्ट महिन्यातही असेच आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी त्या वेळी अनेकांना अटक केली होती. आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या अंगावर वस्तू भिरकावून दिल्या, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आले, अशी माहिती पोलीस उपसहायक आयुक्त क्लेअर स्मार्ट यांनी दिली.