देशाच्या राजधानीत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतील असे दोन प्रकार घडले आहेत. या दोन घटनांमुळे जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खळबळ माजली असून अनेक विद्यार्थी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनयभंग आणि अपहरणाच्या प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जेएनयू विद्यापीठात घडला आहे. एवढंच नव्हे तर एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचीही माहिती समोर येत आहे. रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान दोन विद्यार्थींनी रात्रीच्या जेवणानंतर चालायला गेल्या होत्या. त्यावेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी या दोघींचा विनयभंग करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. “कारमध्ये पाच पुरुष दारूच्या नशेत होते. त्यांनी आम्हाला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला”, असं या मुलींनी तक्रारीत म्हटलं आहे. मुलींना आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मुलींनी आरडोओरडा केला. त्यामुळे हे पाचही आरोपी पळून गेले. या प्रकरणाची तक्रार करण्याकरता पोलिसांना १ वाजता तिसऱ्या विद्यार्थीनीने फोन केला. दरम्यान, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत त्याच ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बुधवारी काळी या मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, दुसरी घटना त्यानंतर थोड्या कालावधीने घडली. हेच पाच आरोपी कारचा दरवाजा उघडा ठेवून आतमध्ये आईसस्क्रीम खात होते. तेवढ्यात पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्यांना हटकले. कारचा दरवाजा बंद करण्यास त्याने सांगितले. पंरतु, याचा राग आल्याने त्यांनी या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणीही किशन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, पीडित विद्यार्थ्याला उपचारांकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारच्या एन्ट्री गेटवर ठेवलेल्या रजिस्टरमधून कारचा तपशील सापडला आहे. त्यानुसार, यातील एक मुलगा हा दुसऱ्या कॉलेजचा बीटेकचा विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. त्याने अनेकदा या विद्यापीठात भेट दिली आहे. त्याचा एक मित्र या विद्यापीठात शिकत असल्याने तो येथे येतो, असं पोलिसांनी सांगितलं. या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 men molest try to abduct 2 jnu stroll sgk