कोणत्याही व्यक्तीस त्याचे वजन हा एक अत्यंत संवेदनशील तसेच जिव्हाळ्याचाही विषय.. कोणतीही लठ्ठ व्यक्ती काही प्रमाणात समाजात चेष्टेचाही विषय ठरते. मग ही व्यक्ती २०० नाही, ३०० नाही, तब्बल ६०० किलो असेल तर ती चेष्टेचा विषय न ठरता चिंतेचा विषय ठरते आणि या माणसाचे केवळ वजन कमी व्हावे म्हणून त्यास राजाच्या खर्चाने ‘फोर्कलिफ्ट’च्या (अवजड वस्तू उचलणारी क्रेन) साहाय्याने येथील रुग्णालयात दाखल करण्याची आफत उद्भवली.
जिझान शहरातील या माणसाचे नाव आहे खालेद मोहसीन शाइरी. त्याला सोमवारी एका खास विमानाने रियाध येथे हलविण्यात आले. मात्र विमानातून रुग्णालयात हलविता यावे म्हणून त्याच्यासाठी एक ‘फोर्कलिफ्ट’ही थेट विमानापर्यंत आणण्यात आली होती. राजे अब्दुल्ला यांच्या आदेशावरून शाइरीसाठी खास पलंगही तयार करण्यात आला, तसेच दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या घरापासून त्याला खाली उतरविण्यासाठी एक क्रेनही आणण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
अवघ्या ६०० किलो वजनाच्या माणसाला रुग्णालयात नेण्यासाठी ‘फोर्कलिफ्ट’ची मदत
जिझान शहरातील या माणसाचे नाव आहे खालेद मोहसीन शाइरी. त्याला सोमवारी एका खास विमानाने रियाध येथे हलविण्यात आले.
First published on: 20-08-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 600kg saudi man forklifted to hospital