दिल्ली विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर व अपात्र घोषित करण्यात आल्यानंतर आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भापजपाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली.
Delhi: Former Aam Aadmi Party (AAP) leader, Kapil Mishra joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of party leaders Manoj Tiwari and Vijay Goel. pic.twitter.com/uFHiPd8ij0
— ANI (@ANI) August 17, 2019
कपिल मिश्रा यांनी शुक्रवारीच ट्विटद्वारे आपण उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवाय ‘दिल्ली चले मोदी के साथ’ असे घोषवाक्य देखील त्यांनी ट्विमध्ये वापरले होते.
विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर कपिल मिश्रा यांनी, मोदींसाठी एकदा नाही तर शंभरवेळा खुर्ची सोडण्यास तयार असल्याचे म्हटले होते.
