आम आदमी पक्षाने (आप) लोकसभा निवडणुकीसाठी २६ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून नरेश पुंगलिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आपने बिहारमधून सहा, तामिळनाडूतून आठ, उत्तरप्रदेशात चार आणि त्रिपूरा, महाराष्ट्र, सिक्कीम, राजस्थान, पंजाब, पदुचेरी, मणिपूर आणि मिझोरम येथून प्रत्यकी एक उमेदवार जाहीर केले आहेत.
निवृत्त सनदी अधिकारी एम. लामनझुला हे मिझोराम लोकसभा मतदार संघातून आपचे उमेदवार आहेत. त्यांनी २००८ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती.