जयपूर : राजस्थानच्या अजमेरमधील विशेष न्यायालयाने गुरुवारी १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध होण्यासाठी पुरेसे आणि सबळ पुरावे देऊ शकत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ८१ वर्षीय टुंडा दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती

अन्य दोन आरोपी इरफान आणि हमिदुद्दीन यांना टाडा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ५ आणि ६ डिसेंबर १९९३ च्या रात्री लखनौ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबई शहरांमधील पाच ट्रेन्समध्ये स्फोट घडवून आणण्याचा आरोप टुंडावर होता. बाबरी उद्ध्वस्त झाल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे स्फोट घडवून आणले होते. यात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. ३० सप्टेंबर २०२१ रोजी टुंडासह तीन्ही आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. टुंडाचे वकील शफकुअतुल्लाह सुलतानी यांनी सांगितले की  अब्दुल करीम टुंडावरचे कोणतेही आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे सादर करता आले नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case zws