Air India Flight security threat : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. ३२० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आणि सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज (१० मार्च) रोजी मुंबई-न्यूयॉर्क (जेएफके) विमान प्रवासादरम्यान एआय११९ विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉल नुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या सौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ प्रवासी प्रवास करत होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी १०.२५ वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

या घटनेनंतर विमानाच्या पुढील उड्डाणीची वेळ बदलण्यात आली आहे, ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर मदत देण्यात आली आहे, असे एअरलाइनने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india new york bound flight returns to mumbai due to security threat marathi news rak